सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना महावितरणाचे आवाहन

सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना महावितरणाचे आवाहन

सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी सवलतीच्या तसेच वहन आकारासह ४ रुपये ३८ पैसे प्रतियुनिट या माफक वीजदराने तात्पुरती आणि अधिकृत वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणाकडून करण्यात आले आहे. त्याशिवाय गणेशोत्सवासाठी वीजसुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात तात्पुरत्या वीजजोडणीच्या बिलींगची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वीजमीटरसाठी घेतलेल्या रक्कमेतील उर्वरित रक्कम गणेश मंडळांना त्वरीत परत करण्याचे निर्देश क्षेत्रिय कार्यालयांना देण्यात आले आहेत.

धार्मिक उत्सवांसाठी वीजपुरवठा अधिकृतच हवा 

सार्वजनिक गणेशोत्सवांकरीता तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट ३ रुपये २० पैसे अधिक एक रुपया १८ पैसे वहन (व्हिलींग) आकार असे ४ रुपये ३८ पैसे प्रती युनिट असे वीजदर आहेत. व्हिलींग चार्जेससह हा दर घरगुती वीजदरापेक्षा फक्त १३ पैशांनी जास्त तर वाणिज्यिक दरापेक्षा २ रुपये ९० पैसे प्रतियुनिटने कमी आहे. धार्मिक उत्सवांसाठी अधिकृतच वीजपुरवठा घेण्यात यावा तसेच सार्वजनिक सुरक्षेला महत्व द्यावे, यासाठी तात्पुरत्या वीजजोडणीचा वीजदर कमी ठेवण्यात आला असल्याचे महावितरणाकडून सांगण्यात आले आहे.

शार्टसर्किटचा धोका टाळा 

उत्सवांमध्ये मंडप किंवा रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी वीजयंत्रणा ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घेण्यात यावी तसेच अर्थिंगचीही खबरदारी घ्यावी. वायरिंगसाठी वापरण्यात येणारे वायर्स हे वीजभारासाठी सक्षम नसल्यास शार्टसर्किटचा धोका निर्माण होतो. याशिवाय सध्या पावसाळी दिवस असल्याने तसेच मंडपासाठी टिनपत्र्यांचा वापर होत असल्याने वायर्स लूज किंवा अनेक ठिकाणी तुटलेले परंतू टेपने जोडलेले असल्यास वीजपुरवठा खंडित होण्यासह अपघाताची मोठी शक्यता असते, त्याची खबरदारी घ्यावी.

महावितरण विभागाच्या मंडळांना सूचना

First Published on: August 27, 2018 9:38 PM
Exit mobile version