सेलिब्रिटींनी ड्रग पुरवणाऱ्या मुख्य सप्लायरला अटक

सेलिब्रिटींनी ड्रग पुरवणाऱ्या मुख्य सप्लायरला अटक

जोगेश्वरी येथून एमडी ड्रग्जसह एका मुख्य सप्लायरला वांद्रे युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. उस्मानअली अन्वरअली शेख असे या 40 वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने 28 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांनी सांगितले. उस्मानअली हा ड्रग्ज सप्लार करणारा मुख्य आरोपी असून त्याने आतापर्यंत काही मॉर्डलसह गर्भश्रीमंतांना ड्रग्ज पुरविल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

जोगेश्वरी परिसरात काहीजण एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती येणार वांद्रे युनिटला मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या पथकातील नंदकुमार गोपाळे, संजीव गावडे, काकडे, सावंत, पेडणेकर, राऊत, लोखंडे, वानखेडे, महांगडे, गवते, लाड, परब यांनी ओशिवरा येथील न्यू लिंक रोड, मेगा मॉलजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती. गुरुवारी तिथे उस्मानअली शेख हा बाईकवरुन आला होता, यावेळी त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले, त्याच्या अंगझडतीत पोलिसांना 139 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले, या ड्रग्जची किंमत सुमारे साडेपाच लाख रुपये आहे. पोलीस तपासात उस्मानअली हा अंधेरीतील ओशिवरा, न्यू लिंक रोडच्या आकाशगंगा अपार्टमेंटमध्ये राहतो. तो ड्रग्ज पुरविणारा मुख्य आरोपी आहे. त्याने आतापर्यंत अनेक मॉर्डलसह गर्भश्रीमंतांना ड्रग्ज पुरविल्याचे उघडकीस आले. त्यासाठी तो डिलीव्हरी बॉयचे वेशांतर करुन संबंधितांच्या घरी जात होता. त्याला ते ड्रग्ज कोणी दिले, तेव्हापासून तो या व्यवसायात आहे याची आता पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.


 

First Published on: September 25, 2020 7:45 PM
Exit mobile version