वीजबिल सवलतीची ग्राहकांना यंदा दिवाळीभेट

वीजबिल सवलतीची ग्राहकांना यंदा दिवाळीभेट

विजेचा १०० युनिट वापर करणाऱ्या ग्राहकांना राज्य सरकारमार्फत दिवाळी भेट मिळणार आहे. लॉकडाऊनच्या काळात वाढीव वीजबिलाचा फटका बसलेल्या वीज ग्राहकांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळेच दिवाळीच्या काळात हा दिलासा मिळेल असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले.

साधारपणे १०० युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्या ग्राहकांना दिलासा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे या ग्राहकांचा वाढीव वीजबिलाचा भार राज्य सरकार घेईल. साधारणपणे १०० युनिट वीज वापर असलेल्या ग्राहकांची सवलतीची फाईल ही ऊर्जा विभागाकडून अंतिमतः तयार झाली आहे. ही फाईल येत्या दिवसात वित्त विभागाकडे पाठवण्यात येईल. आता अजितदादा आजारी असल्यानेच यावर येत्या दिवसात निर्णय होणे अपेक्षित आहे. पण दिवाळीसाठीची ही नक्कीच अशी भेट असेल असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले.

आज ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी टाटा औष्णिक वीज निर्मिती केंद्रात कंट्रोल रूमची पाहणी केली. गेल्या महिन्यात 12 ऑक्टोबर रोजी मुंबईतील वीज पुरवठा ठप्प झाला तेव्हा टाटा पॉवर ने नेमकं नियोजन कसे केले आणि टाटाची आयलँडिंग यंत्रणा कशी काम करतेय, याबद्दल ते टाटा पॉवर च्या अधिकारी वर्गाशी चर्चा केली.


 

First Published on: November 2, 2020 3:55 PM
Exit mobile version