आंतराष्ट्रीय विमानतळ परिसराजवळ भर दिवसा गोळीबार

आंतराष्ट्रीय विमानतळ परिसराजवळ भर दिवसा गोळीबार

प्रातिनिधिक फोटो

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळा जवळ असलेल्या सहार गावात गोळी बार झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. या घटनेत एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या जखमी महिलेला जवळील रुग्णालयात नेण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. वैयक्तिक वादातून हा गोळीबार झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. हल्लेखोरांनी या परिसरात येणाऱ्या एका इसमाचा जीव घेण्याच्या उद्देशाने गोळ्या झाडल्या होत्या. मात्र या हल्ल्यापासून हा इसम बचावला असून या गोळ्या एका महिलेला लागल्या. मात्र या घटनेनंतर परिसरात भितीचे वातावरण होते. मुक्तार शेख असे या इसमाचे नाव होते. जागेच्या वादामुळे त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला.

कसा घडला प्रकार

आज दुपारी मुक्तार शेख सहार गाव परिसरात आला होता. आपल्या गाडीतून उतरताना त्याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. मात्र या हल्ल्यात मुक्तार बचावला. घटनेनंतर या हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेनंतर येथील स्थानिक रहिवाशांनी महिलेला रुग्णालयात नेले. या घटनेची माहिती सहार पोलिसांना देण्यात आली.

“या प्रकरणी जीवे मारण्याचा गुन्हा नोंदवला आहे. मुक्तार शेखला मारण्यासाठी अज्ञात इसमांनी येथे पाळत ठेवली होती. वैयक्तिक वादामुळे हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सध्या जखमी महिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहे. त्यांची प्रकृती स्थिर झाल्यावर जबाब नोंदवला जाईल.” – सहार पोलीस, तपास अधिकारी

आपलं महानगरची नाशिक आवृत्ती १८ जानेवारी पासून सुरु
First Published on: January 16, 2019 7:10 PM
Exit mobile version