Video: साप पकडून व्हिडिओ बनवणाऱ्याला नागपंचमीच्या दिवशीच अटक

Video: साप पकडून व्हिडिओ बनवणाऱ्याला नागपंचमीच्या दिवशीच अटक

सापाचे व्हिडिओ बनवून व्हायरल करणाऱ्याला अटक

लॉकडाऊन दरम्याम काम नसल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे कमाविण्यासाठी सापाला पकडून त्याचे खेळ करत आणि स्टंट करणाऱ्या एका इसमाला कल्याणच्या वन विभागाने नागपंचमीच्या दिवशीच अटक केली आहे. डोंबिवलीच्या नांदीवली परिसरात राहाणारा निरव गोगरी हा आरोपी बेकायदेशीरपणे साप पकडून त्याचे व्हिडिओ तयार करायचा. सापाशी स्टंट करणारे व्हिडिओ तो सोशल मीडियावर व्हायरल करीत होता. याबाबत वनविभागाला माहिती मिळताच वनविभागाने तत्काळ त्याचा शोध घेत कल्याणच्या वनखात्याने अटक केली आहे.

ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी कल्पना वाघेरे, वनरक्षक रोहित भोई, जयेश घुगे, राज्य राखीव पोलीस दलाचे सह.पोलीस उपनिरीक्षक मारुती काळे आणि वनविभाग राज्य राखीव पोलीस दलाचे पोलीस कर्मचारी यांनी केली.

First Published on: July 25, 2020 9:17 PM
Exit mobile version