ठाणे : मेडिकलमध्ये घुसून चोराने झाडली गोळी; एकाचा मृत्यू

ठाणे : मेडिकलमध्ये घुसून चोराने झाडली गोळी; एकाचा मृत्यू

भल्या पहाटे उजाडण्याअगोदर कळवा पूर्व येथील एका मेडिकलमध्ये शिरुन एका चोरट्याने मेडिकलमध्ये झोपलेल्या तरुणावर गोळी झाडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. परिसरात अजूनही भीतीचे वातावरण आहे. या घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाली असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.

कळवा पूर्व भागामध्ये रात्री मेडीकल बंद होते. या मेडिकलच्या आत एक २६ वर्षीय तरुण झोपला होता. चोरट्याने मेडिकलचे शटर तोडले आणि तो आतमध्ये शिरला. तो चोरी करण्यासाठी पुढे धजावत होता तेवढ्यातच तरुणाला अचानक जाग आली. तो मुलगा पुढे धजावला तेवढ्यातच चोरट्याने गोळी झाडली. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर चोरटा पळून गेला.

या घटनेची माहिती मिळताच कळवा पोलीस आणि ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करुन तपास सुरु केला. मारेकऱ्याला शोधण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहेत. या घटनेप्रकरणी पोलिसांना सीसीटीव्हीच्या मदतीने धागेदोरे मिळाले असून मारेकऱ्याला लवकरात लवकर शोधून काढण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहे.

First Published on: December 28, 2019 4:21 PM
Exit mobile version