Drugs Case: मनीष भानुशाली,किरण गोसावी,सॅम डिसूझाच या प्रकरणाचे मास्टरमाइंड, सुनिल पाटील यांचा खुलासा

Drugs Case: मनीष भानुशाली,किरण गोसावी,सॅम डिसूझाच या प्रकरणाचे मास्टरमाइंड, सुनिल पाटील यांचा खुलासा

Drugs Case: मनीष भानुशाली,किरण गोसावी,सॅम डिसूझाच या प्रकरणाचे मास्टरमाइंड, सुनिल पाटील यांचा खुलासा

ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा मास्टर माइंड सुनिल पाटील असल्याचा आरोप मोहित भारतीय यांनी केला होता. या गंभीर आरोपांवर सुनिल पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करत ड्रग्ज प्रकरणाशी माझा काहीही संबंध नसल्याचा म्हटले आहे. मनीष भानुशाली, किरण गोसावी,सॅम डिसूझाच या प्रकरणाचे मास्टरमाइंट असल्याचा खुलासा सुनिल पाटील यांनी केला आहे. त्याचप्रमाणे समीर वानखेडे यांच्याशी देखील माझ्या काही संबंध आला नाही त्यांचा नंबर देखील माझ्याकडे नाही असे सुनिल पाटील यांनी म्हटले आहे. एबीपी माझाशी बोलताना सुनिल पाटील यांनी ही माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी ड्रग्ज प्रकरणात अनेक नवे खुलासे समोर आणले आहेत.  त्याचप्रमाणे सुनिल पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचा दावा करण्यात आला होता त्यावर खुलासा करत मी १९९९ ते २०१६पर्यंत राष्ट्रवादीत होतो. २०१६नंतर माझा राजकारणाशी काहीही संबंध नसल्याचे सुनिल पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

मनिष भानुशाली सोबत १२ वर्षांपासून संबंध

ड्रग्ज प्रकरणातील पंच मनीष भानुशाली यांचे गुजरातच्या मंत्र्यांसोबत संबंध असल्याचा दावा त्यांनी केला. क्रूझ पार्टीची माहिती मनिष भानुशाली, धवल भानुशाली आणि निरज यादव यांनाच मिळाली होती. मनिषसोबत माझे १२ वर्षांपासून संबंध होते. २७ सप्टेंबरला कामासाठी आम्ही अहमदाबादला गेलो होतो.या प्रकरणाची टिप त्यांना मिळाल्यानंतर ४ वाजता त्याचा मित्र धवल भानुशाली आणि नीरज यादवने फोन केला होता. कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टी होणार आहे. तुमच्याकडे काही एनसीबीचे संपर्क असतील द्या. त्यासाठी मी नकार दिला. यातील नीरज यादव हा मध्य प्रदेशातील भाजपचा कार्यकर्ता असून मोठ मोठ्या नेत्यांच्या संपर्कात होता असल्याचे त्यांनी सांगितले. तर किरण गोसावीला मी ४ सप्टेंबरपासून ओळखतो. २२ सप्टेंबरला त्यांनी मला फोन केला असे त्यांनी सांगितले.

सॅम डिसूझाने २५ लाखांची मदत मागितली

सॅम डिसूझाला मी एक वर्षांपासून ओळखत असल्याचे सुनिल पाटील यांनी सांगितले. सॅम डिझूला एक महिन्यापूर्वी ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने समन्स पाठवल होते. त्यांनी ते मला पाठवले होते. ही चार महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. त्यानुसार सॅम डिसूझा एनसीबी कार्यालयात स्टेटमेंट देऊन आला होता. त्यानंतर त्याने माझ्याकडे एनसीबीला देण्यासाठी २५ लाखांची मदत करण्यासाठी सांगितले. त्यानंतर सॅम डिसूझा एनसीबीमधून सुटला आणि ही गोष्ट माझ्या लक्षात होती म्हणून मी धवल भानुशाली आणि नीरज यादव यांना सॅमचा संपर्क करुन दिला.

२७ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरपर्यंत अहमदाबादलाच होतो 

किरण गोसावी, सॅम डिसूझा यांनी शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी हिच्यासोबत २५ करोड रुपयांचे डिल झाल्याचे सांगण्यात येत आहे त्याविषयी बोलताना सुनिल पाटील यांनी सांगितले, जेव्हा हे प्रकरण झाले तेव्हा मी मुंबईत नव्हतो मी अहमदाबादमध्ये होतो. त्यामुळे त्यांच्याच काय झालं याविषयी मला माहिती नाही. मी २७ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरपर्यंत अहमदाबादलाच होतो,असे सुनिल पाटील यांनी सांगितले. रात्री मला किरण गोसावीचा फोन आला होता. या प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा असल्याचे त्याने मला सांगितले होते. सकाळी पुन्हा किरण गोसावीचा फोन आला. आमचे काम झाले असून ५० लाख मान्य झालेत. आता हे पैसे कुठे ठेवू याविषयी बोलण्यासाठी माझा आणि प्रभाकर साईलचा संपर्क झाल्याचा सुनिल पाटील यांनी सांगितले.

दिल्लीत मला मारहाण झाली

माझ्या जिवाला धोका होता. धवन भानुशाली,मनिष भानुशाली आणि इतर लोकांनी मला दिल्लीत मारहाण केली. अहमदाबादवरुन मला दिल्लीत बोलावण्यात आले. दोघांनीही मला कुठे जायचे नाही असे सांगितले होते. बऱ्याचदा त्यांनी माझे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला होता. मी माझा जीव वाचवून कसा बसा मुंबईत आलोय असे सुनिल पाटील यांनी म्हटले आहे.


हेही वाचा –  अस्लम शेख यांचे काशिफ खानशी संबंध काय? कॉल रेकॉर्डची चौकशी करा, मोहित भारतीयांची मागणी

First Published on: November 7, 2021 5:11 PM
Exit mobile version