Mansukh Hiren Death Case : सचिन वाझेंची नागरी सुविधा केंद्रात बदली

Mansukh Hiren Death Case : सचिन वाझेंची नागरी सुविधा केंद्रात बदली

मी माफीचा साक्षीदार, आता नेमकं काय करायचं?, सचिन वाझेंचा कोर्टात प्रश्न

मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात संशयास्पद भूमिका असणारे असिस्टंट पोलीस इंस्पेक्टर सचिन वाझे यांना तात्काळ अटक करावी , अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. अखेर यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घोषणा करत सचिन वाझे यांची क्राईम ब्रँचमधून बदली केली जाणार, अशी घोषणा केली होती. दरम्यान, सचिन वाझे यांची नागरी सुविधा केंद्रात बदली करत मुंबई पोलिसांच्या विशेष शाखा १या ठिकाणी बदली करण्यात आली आहे.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणात विरोधकांनी सभागृहात दोन दिवस जोरदार गोंधळ घातला. सचिन वाझेंवर निलंबनाची कारवाई होणार नाही, तोवर विधिमंडळाचे सभागृह चालू देणार नाही, अशी भूमिका विरोधी पक्षाने घेतली होती. सचिन वाझे प्रकरणाचे पडसाद हे मंगळवारी झालेल्या अधिवेशनाच्या कामकाजातही दिसले होते. या संपूर्ण प्रकरणात अजितदादांनी सचिन वाझे यांच्या बदलीच्या कारवाईचा संपूर्ण किस्सा अधिवेशनाचे सूप वाजताना पत्रकारांना सांगितला. अधिवेशाच्या समारोपाला घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री यांनी कोणत्या परिस्थितीत सचिन वाझे यांच्या बदलीचा निर्णय घ्यावा लागला या गोष्टीचा उलघडा केला आहे. एकूणच या संपूर्ण प्रकरणात सरकारला बॅकफुकटला जाव लागल्याचीच एक प्रकारे स्पष्टोक्ती अजितदादांच्या उत्तरातून दिसून आली. दरम्यान, सचिन वाझेंची बदली करण्यात आली आहे.

हिरेन मृत्यूप्रकरणी एटीएस पथकाकडून घटनेची पुनरावृत्ती

घटनेची पुनरावृत्ती करण्यासाठी एटीएस पथकाने मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळल्याच्या ठिकाणी गुरुवारी रात्री उशीरा घटनेचे नाट्य रुपांतर केले. रात्री उशिरा एटीएस आणि फॉरेन्सिक अधिकाऱ्यांची टीम रेतीबंदर परिसरात पोहोचली होती. मनसुख हिरेन यांच्याइतक्याच वजनाचा पुतळा यासाठी वापरण्यात आला आहे. ४ आणि ५ मार्च रोजी जशी समुद्राची स्थिती होती तशीच रात्री असल्याने एटीएस पथकाने गुन्ह्याचं नाट्यरुपांतर केले आहे. यासाठी एटीएसच्या पथकाने स्थानिक मच्छिमांरांची मदत घेतली आहे.


हेही वाचा – विद्यार्थ्यांना आंदोलन करायला लागणे दुर्देवी, MPSC निर्णयात कमी पडली – उपमुख्यमंत्री


 

First Published on: March 12, 2021 9:44 AM
Exit mobile version