अशोक चव्हाणांना पदावरून हटवा, मराठा समाजाच्या बैठकीत ठराव पास!

अशोक चव्हाणांना पदावरून हटवा, मराठा समाजाच्या बैठकीत ठराव पास!

मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालया प्रलंबित असून आता पुढची सुनावणी २५ जानेवारीपर्यंत पुढे ढकलली गेली आहे. त्यामुळे मराठा समाजामध्ये नाराजीची भावना असताना दुसरीकडे राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात समर्थपणे बाजू मांडली जाणार असल्याचं देखील सातत्याने सांगितलं जात आहे. मात्र, या सगळ्यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर कोणताही तोडगा निघत नसल्यामुळे मराठा समाजात संतापाची भावना असून या पार्श्वभूमीवर मुंबईत झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीमध्ये अशोक चव्हाण यांना पदावरून तातडीने हटवण्यायत येण्याची मागणी करणारा ठराव पास करण्यात आला आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज आग्रमक होत असल्याचं दिसून येत आहे.

मराठा समाजाच्या बैठकीत पास झालेले प्रमुख १० मुद्दे…

१. अशोक चव्हाण यांना उपसमितीच्या पदावरून काढून अजित पवार, एकनाथ शिंदे ,जयंत पाटील यांना घ्यावे

२. केंद्र सरकारने नवीन कायदेतज्ज्ञांचा समावेश करून रणनीती ठरवावी

३. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत सरकारने चर्चा करावी, बैठक घ्यावी

४. जो पर्यंत सुप्रिम कोर्टाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत नोकर भरती करू नये

५. स्थगितीपूर्वी नोकर भरती पूर्ण झालेल्यांना त्वरीत नियुक्त्या द्याव्यात

६. इच्छुक उमेदवारांना तोपर्यंत EWS कोट्यातून आरक्षण द्यावं

७. ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय नाही झाला तर ३ जानेवारीला पुन्हा बैठक. या बैठकीत आंदोलन, रस्ता रोको धरणे यावर निर्णय होईल

८. जे आज आले नाहीत त्यांनी ३ जानेवारीला उपस्थिती राहावं म्हणजे निर्णय घेता येईल

९. कोपर्डी आणि तांबडीच्या गुन्हेगारांना त्वरीत फाशी द्यावी

१०. सारथी, मागास विकास महामंडळ, हे विषय त्वरीत मार्गी लावावेत

First Published on: December 20, 2020 3:43 PM
Exit mobile version