डॉ. राजश्री कटकेंवर २१ दिवसांच्या आत कारवाईची मार्डकडून मागणी

डॉ. राजश्री कटकेंवर २१ दिवसांच्या आत कारवाईची मार्डकडून मागणी

१२ दिवसांच्या आत कारवाई व्हावी, मार्डची मागणी

जे. जे. हॉस्पिटलमधील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राजश्री कटके यांच्याविरोधात एका विद्यार्थीनींनी मध्यवर्ती मार्ड संघटनेकडे तक्रार दाखल केल्यानंतर आता स्थानिक मार्डनेसुद्धा कारवाईसाठी पत्र लिहिले आहे. याविषयी स्थानिक मार्ड संघटनेने या मुलीच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय घेत तिला पाठींबा द्यायचा विचार केला आहे.

२१ दिवसांच्या आत कारवाई करा 

आगामी २१ दिवसांच्या आत डॉ. राजश्री कटके यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मार्डकडून करण्यात आली आहे. याविषयी स्थानिक मार्ड संघटनेकडून प्रशासनावर दबाव टाकला जात आहे. निवासी डॉक्टरांकडे वरिष्ठांकडून होणाऱ्या पैशाच्या मागणीतून त्यांचे करीअर उद्धस्त होत असते. त्यामुळे या विषयाबाबतच्या निवासी डॉक्टरांच्या तक्रारीची जे. जे. मार्ड गंभीर दखल घेत असल्याचे अध्यक्ष डॉ. उमंग शांडिल्या यांनी सांगितलं आहे. तक्रारदार डॉक्टरला स्थानिक मार्डचाही पाठींबा असून प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे २१ दिवसांच्या आत कारवाई करण्याची मागणी या पत्रात केली आहे.

” डॉ. कटके यांच्याविषयी आमच्याकडे तक्रार आली तेव्हा आम्हांला असं वाटलं की आधी प्रशासनाच्यापुढे हा विषय आला पाहिजे. त्यामुळे आम्ही जे.जे प्रशासनाला याविषयीचं पत्र लिहिलं आहे. ज्यामुळे, तोडगा काढणं सोपं होईल. त्यासाठी २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. “

-जे.जे. मार्डचे अध्यक्ष डॉ. उमंग शांडिल्या

First Published on: February 20, 2019 10:04 PM
Exit mobile version