पुण्याच्या धर्तीवर महावितरणला रस्ते फी मध्ये सवलत ?

पुण्याच्या धर्तीवर महावितरणला रस्ते फी मध्ये सवलत ?

kdmc

प्रतिनिधी :केंद्र शासनाच्या नागरी सेवा आणि उच्च दर्जाच्या सुविधा (आयपीडीएस) अंतर्गत राबविण्यात येणार्‍या योजनेत आकारण्यात येणारी रस्ते दुरूस्ती फी पुणे महापालिकेप्रमाणेच आकारण्यात यावी, अशी मागणी महावितरणने महापालिकेकडे केली आहे. महापालिकेच्या मागणीनुसार शुक्रवार १९ ऑक्टोबरच्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शुक्रवारी यावर निर्णय होऊन ही फी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

केंद्र सरकारने शहरी भागासाठी नागरी सेवा व उच्च दर्जाच्या सुविधा (आयपीडीएस) देण्यासाठी महावितरणमार्फत योजना राबविण्यात येणार आहेत. या योजनेतंर्गत भूमीगत वाहिन्या टाकणे, नवीन ट्रान्सफार्मर उभारणे व अस्तित्वातील ट्रान्सफार्मरमध्ये सुधारणा करणे अशी कामे प्रस्तावित आहेत. या प्रकल्पातंर्गत केडीएमसी क्षेत्रातील एकूण १६८ .०५ किमी रस्ते खोदावे लागणार आहे. सध्या महापालिका सेवावाहिन्या टाकण्यासाठी रस्ते खोदकाम करताना रस्ते दुरूस्ती फी ७००६ प्रति रनिंग मीटर आकारत आहे. त्यानुसार खोदकाम केलेले रस्ते पूर्ववत करण्यासाठी महावितरणला ११७ कोटी रूपये पालिकेकडे भरावे लागणाार आहेत.

सदर रस्ते दुरूस्ती फी आयपीडीएस योजनेखालील संपूर्ण प्रकल्पांच्या किंमतीपेक्षा अधिक आहे. पुणे महापालिकेप्रमाणेच २३५० रूपये प्रति रनिंग मीटर आकारली जात आहे. इतर महापालिकेत हा दर कमी आहे. त्यामुळे पुण्याप्रमाणेच कल्याण-डोंबिवली महापालिकेने रस्ते दुरूस्ती फी २३५० रूपये प्रति रनिंग मीटर आकारावी, अशी मागणी महावितरणने केडीएमसीकडे केली आहे. त्यानुसारच महापालिका प्रशासनाने हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसाठी मंजुरीसाठी ठेवला आहे.

इतर महापालिका आकारीत असलेली फी …

नागपूर महापालिका —– २० टक्के लेबर चार्ज अथवा १०० रूपये रनिंग मीटर
पूणे महापालिका —– २३५० रनिंग मीटर
उल्हासनगर —— १०० रूपये रनिंग मीटर
वसई विरार —- २०९० रूपये प्रति रनिंग मीटर

First Published on: October 19, 2018 1:34 AM
Exit mobile version