नवीन वर्षात धावणार मारूती सुझुकीच्या डिझेल कार

नवीन वर्षात धावणार मारूती सुझुकीच्या डिझेल कार

नवीन वर्षात धावणार मारूती सुझुकीच्या डिझेल कार

देशातील सर्वात मोठ्या प्रमाणात कार निर्मिती करणारी कंपनी म्हणजे मारूती सुझुकी. मारूती सुझुकी आता पुन्हा एकदा नव्या रूपात ग्राहकांसमोर येत आहे. २०२१मध्ये मारूती सुझुकी ग्राहकांसाठी पुन्हा एकदा डिझेल इंजिन असलेल्या कार बाजारात आणणार आहे. कंपनी पुन्हा एकदा डिझेल कारचे उत्पादन सुरू केले आहे. डिझेल सेगमेंटमधील वाहनांना ग्राहकांकडून मोठी मागणी असल्याने कंपनीने डिझेल कार बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे एसयूव्ही आणि मल्टिपर्पज व्हेईकल्स वाहनांना बाजारात मोठी मागणी आहे.त्यामुळे मारूती सुझुकी डिझेल कार बनवण्याच्या तयारीला लागली आहे.

एप्रिल २०२० पासून बीएस VI उत्सर्जनात कडक नियम लागू करण्यात आले होते. त्यानंतर मारूती सुझुकीने डिझेल कार उत्पादन पूर्णपणे बंद केले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मारूती सुझुकीने मानेसर पॉवपट्रेन प्लॉट अद्ययावत करण्यासाठी सुरूवात केली आहे. पुढच्या वर्षांच्या मध्यापर्यंत किंवा सणांच्या हंगामात बीएस VI डिझेल इंजिन कार बाजारात येऊ शकतात.

२०२१च्या नव्या वर्षांत मारूती सुझुकीची सुझुकी अर्टिगा आणि मारूती सुझुकी विटारा ब्रेझा मॉडेल्स बाजारात जेऊ शकतात. हे मॉडेल बीएस- ६ सुसंगत पॉवरट्रेनद्वारे देशभरात पहायला मिळणार आहे. कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भविष्यात तंत्रज्ञनाविषयी आणि कंपनीच्या वाटचालीविषयी कोणतेहे संकेत देऊ शकत नाही असे त्यांनी म्हटले आहे. मारूती सुझुकी मानसेर प्रकल्पात आपले स्टेटस अपडेट करण्याच्या तयारीत आहेत. पहिल्यांदा कंपनीने या विकासासाठी १ लाख ५०० सीसीचे bs६ उत्सर्जन मानक डिझेस इंजिन बाजारात आणले होते. काही काळापर्यंत कंपनीने या पॉवरट्रेनचा वापर मध्यम आकाराचे सेडान सियाज आणि अर्टिगामध्ये केला होता. विटारा ब्रेजा, डिजायर, स्विफ्ट, एश क्रॉस आणि बलेनामध्ये फियाटचे १ लाख ३०० सीसीचे इंजिन देण्यात आले होते.


हेही वाचा – अवघ्या ३९० रूपयात घरी न्या, मारूतीच्या सात सीटर एर्टिगाचे मॉडेल

 

First Published on: December 14, 2020 4:51 PM
Exit mobile version