एमकॉम सत्र ४ व आयडॉलच्या परीक्षेचा निकाल जाहीर

एमकॉम सत्र ४ व आयडॉलच्या परीक्षेचा निकाल जाहीर

मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या अंतिम वर्ष किंवा सत्राच्या नियमित परीक्षेतील पदव्युत्तर एमकॉम सत्र ४ चा निकाल जाहीर झाला. या परीक्षेचा निकाल ९४.७० टक्के लागला आहे. त्याचप्रमाणे आयडॉलच्या तृतीय वर्ष बीकॉम व बीए परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून यातील तृतीय वर्ष बीकॉम परीक्षेचा निकाल ८७.०३ टक्के लागला आहे.

एमकॉम सत्र ४ या परीक्षेत ६ हजार ९४५ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. या परीक्षेला ९ हजार ७४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८ हजार ९६७ एवढे विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. तर १०७ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच ३८९ विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत.

त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या तृतीय वर्ष बीकॉम व बीए परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून यातील तृतीय वर्ष बीकॉम परीक्षेचा निकाल ८७.०३ टक्के लागला आहे. बीकॉम परीक्षेत २०८९ विद्यार्थ्यांनी प्रथम वर्ग प्राप्त केला असून ६६४ विद्यार्थ्यांनी व्दितीय वर्ग प्राप्त केला. ६५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला ६ हजार २३१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५ हजार ८९३ एवढे विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. तर ३३८ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच ५०८ विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. आयडॉलच्या तृतीय वर्ष बीए परीक्षेचा निकाल ९१.४७ टक्के लागला आहे. बीए परीक्षेत २०४६ विद्यार्थ्यांनी प्रथम वर्ग प्राप्त केला असून ४३१ विद्यार्थ्यांनी व्दितीय वर्ग प्राप्त केला. २१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला ३ हजार २७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३ हजार ५८९ एवढे विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. तर २०० विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच २५१ विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षांचे निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. आजपर्यंत विद्यापीठाने २०६ निकाल जाहीर केले आहेत.

First Published on: November 12, 2020 6:13 PM
Exit mobile version