Mega Block update : मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार दि. २१.११.२०२१ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक परिचालीत करणार आहे.ठाणे -कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.३७ ते दुपारी २.४८ पर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या नियोजित थांब्यांवर थांबतील आणि गंतव्यस्थानी त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचणार आहेत.

कल्याण येथून सकाळी १०.२६ ते दुपारी ३.१९ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांच्या नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर या सेवा मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि गंतव्यस्थानी त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील.

कुर्ला- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३९ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेलकरीता सुटणारी हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

तथापि, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कुर्ला आणि पनवेल – वाशी दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत मेन लाइन आणि ट्रान्सहार्बर मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी आहे. हे देखभाल मेगाब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.


हे ही वाचा – बळीराजाच्या रेट्यापुढे केंद्रातील अहंकारी, हुकुमशाही वृत्तीच्या मोदी सरकारला झुकावे लागले!: नाना पटोले


 

First Published on: November 19, 2021 3:53 PM
Exit mobile version