मानसिक विकलांग मुलींसाठी लॉकडाऊन ठरले वरदान, घरकामांमध्ये झाल्या तरबेज

मानसिक विकलांग मुलींसाठी लॉकडाऊन ठरले वरदान, घरकामांमध्ये झाल्या तरबेज

कोठवाडी, पद्मबाई ठक्कर मार्ग, शिवाजी पार्क (माहिम) येथे मानसिक विकलांग मुलांसाठी ‘आव्हान पालक संघ’ गेले २५ वर्षे काम करत आहे. लॉकडाऊनच्या काळात ही मुले काय करणार असा प्रश्न या संस्थेत येणार्‍या मुला, मुलांची पालकांना होता. आपण सर्व सामान्य माणसे लॉकडाऊन, समजू शकतो,पण ज्यांच्या बुध्दीतच कमतरता आहे त्यांना कसे आणि किती समजवणार? मानसिक विकलांगांना समजावणे खूपच कठीण असते, लॉकडाऊनमध्ये 24 तास घरात च डांबून ठेवायचे पाहिजे खूपच कठीण होऊन जाते. पालकांना रोजच त्यांचे आवरून शाळा, कार्यशाळा इ.ठिकाणी पाठवणे जिकिरीचे होत असते. त्यात लॉकडाऊनची भर पडली. 20 मार्चला कार्यशाळा बंद झाली.

लाॅकडाऊन एक आव्हान

मात्र संस्थेच्या संचालिका, अध्यक्षा वंदन कर्वे यांनी हे लॉकडाऊन एक आव्हान समजून ते स्वीकारले. लॉकडाऊन वाढला तसे कर्वे मॅडम मुलींशी,पालकांशी वॉटसॅपवर बोलू लागल्या. एप्रिलपासून पालकांना समजावून मुलींसाठी टास्क देऊ लागल्या. एप्रिलचे टास्क होते. वैयक्तिक स्वच्छता. नुसतेस प्रातःविधी नाहीत. त्याबरोबर या मानसिक विकलांग मुलींनी स्वतःचे कपडे स्वच्छ धूणे, आपली कपबशी,ताट,वाटी,भांड आपणच धुवायचे यामुळे मदत आणि व्यायाम दोन्ही झाले.
वंदना कर्वे यांनी पालकांना पाण्याचा वापर कसा कमीत कमी करावा याचे बौध्दिक दिले. मुले ते करत असतानाचे व्हिडिओ पाठविण्यास सांगितले. यामुळे खरोखर या दिव्यांग मुली ते काम करताना दिसल्या. पंधरा दिवसांनी घरातील इतरांच्याही कपबश्या धुण्यास त्यांना प्रवृत्त केले. हळूहळू बाकीच्या ताट,वाट्या इतर साधी भांडी घासणे करायला आपोआपच शिकल्या.आतातर एक वेळची सबंध भांडी घासतात. अर्थात सगळ्यांना येत नाही पण भांडी जागच्या जागी लावतात.हेही नसे थोडके.

घर काम झाले सोपे

आपल्या कपड्याबरोबर, छोटे टॉवेल्स, हात पुसणी धुतली जाऊ लागली. यावर हात बसल्यावर आईला स्वयंपाकात मदत करू लागल्या. पालेभाजी, शेंगभाजी निवडणे, धुणे, चिरणे, शिकल्या, कांदा बारीक चिरणे, कणिक भिजवणे, ताक करणे अशी किरकोळ पण आवश्यक कामेही त्या करू लागल्या.

स्वावलंबी आणि आत्मनिर्भर

वॉशिंग मशीन चालवायला शिकल्या. कपडे वाळत घालायला शिकल्या. केर काढणे, लादी फुसणे शिकल्या. अशा कितीतरी कामात या मुली तरबेज झाल्या. काही मुली तर पोळ्या करण्यासही शिकल्या. एक मुलगी आधीपासूनच शिवण शिवते.आता ती मास्क ही शिवते. पिशव्या, मास्क यात ती तरबेज झाली आहे ऑर्डर हि घेते. अर्थात तिच्या आईचा खूपच पाठींबा आहे. कमाईही करते.जेव्हा आता लॉकडाऊन संपेल तेव्हा संपो पण माझ्या मुली मात्र घरकामात कुशल झाल्या. लॉकडाऊनमुळे माझी स्पेशल मुलं स्वावलंबी, आत्मनिर्भर, अर्थार्जन करणार्‍या झाल्या. त्यामुळे आमच्यासाठी तरी लॉकडाऊन झिंदाबाद आहे, असे वंदना कर्वे यांनी आत्मविश्वासपूर्वक सांगितले.

First Published on: July 1, 2020 5:13 PM
Exit mobile version