हे अजबच : महिलेचे महिलेविरोधातच #MeToo

हे अजबच : महिलेचे महिलेविरोधातच #MeToo

सध्या मोठ्या प्रमाणात #MeToo ची लाट आलेली पाहायला मिळत आहे. अनेक महिला आपल्यावरील अत्याच्याराविरोधात उघड बोलू लागल्यामुळे आता MeTooचे वादळ आलेलेल पाहायला मिळत आहे. आतापर्यंत Metoo मध्ये दिग्गज अभिनेते नाना पाटेकर, अलोक नाथ, रजत कपूर, दिग्दर्शक विकास बहल, लेखक चेतन भगत, गायक कैलाश खेर यांच्यावर महिलांनी गैरवर्तवणुकीचे आरोप केले आहेत. हे वाद सध्या सुरु असताना आता MeToo विषयी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. एका महिलेनेचे महिलेविरोधात #Metoo असा लैंगिक छळ केल्याची बाब समोर आली आहे. यामुळे #MeToo कँपेनमध्ये एका महिलेने महिलेवर अशा प्रकारचा आरोप केल्याची पहिलीच घटना आहे.

कोणी केला #MeToo चा आरोप

विनोदी महिला कलाकार कनिझ सुर्का हिने #MeTooच्या माध्यमातून तिची सहकारी असलेली विनोदी कलाकार आहिती मित्तल हिच्यावर #MeToo केल्याचा आरोप केला आहे. आहिती मित्तल हिने एका कार्यक्रमात जबरदस्तीने चुंबन घेतल्याचा आरोप कनिझ सुर्का हिने केला आहे. या कार्यक्रमाला अनेक प्रेक्षक आणि इतर विनोदी कलाकारही तिथे उपस्थित होते. या घटनेने मी सुन्न झाले. खूप अपमानित देखील वाटले. पण माझ्याकडे पर्याय नसल्याचे कनिझ सुर्का हिने सांगितले आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीच्या स्वत:च्या क्षमता आणि मर्यादा असतात. त्याचे उल्लंघन केल्याचे देखील तिने एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

नेमके काय घडले?

अंधेरी येथे एका कार्यक्रमात २०१६ साली विनोदी महिला कलाकार कनिझ सुर्का स्टेजवर उभी होती. त्या दरम्यान आदिती अचानक स्टेजवर आली आणि तिने कनिझ सुर्का हिचे जबरदस्तीने चुंबन घेतल्याचा आरोप केला आहे. थोडी हिंमत करुन कनिझ हिने आदितीला जाब देखील विचारला. त्यावर आदितीने माफी देखील मागितली. परंतु नंतर काहीच बोलू देखील नाही. तसेच काहीच झाले नसल्यासारखी वागू लागली. मात्र आता आदितीने जाहिर माफी मागावी असे वाटू लागले. यासाठी कनिझ सुर्का हिने तिच्या एका जुन्या मैत्रिणीची मदत घेऊन आदितीने जाहीर माफी मागावी अशी विनंती केली. मात्र आदितीने त्याला नकार दिला. मात्र कनिझ सुर्का हिने आपल्याकडे याबद्दलचे पुरावे आहेत आणि आता मी गप्प बसणार नसल्याचे तिने सांगितले आहे.

First Published on: October 10, 2018 9:46 PM
Exit mobile version