आत्ता मीरा-भाईंदरकरांचा प्रवास होणार सुखरूप

आत्ता मीरा-भाईंदरकरांचा प्रवास होणार सुखरूप

मेट्रो

प्रवाशांना आत्ता उपनगरीय रेल्वेच्या धकाधकीच्या प्रवासातून लवकरच सुटका मिळणार आहे. दक्षिण मुंबईहून आत्ता थेट मेट्रो पकडून मीरा-भाईंदरला जाणे शक्य होणार आहे.

मुंबईच्या पश्चिम उपनगरांना जोडणारी १०.५ किं. मी. लांबीची दहिसर-मीरा-भाईंदर मेट्रो-९ हा प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. या एलिव्हेटेड मार्गाची एकूण लांबी १३.५७ किमी असून यात एकूण ११ स्थानके असणार आहेत.
तसेच अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टर्मिनल-२) मेट्रो-७ या मार्गालाही राज्य सरकारने मान्यता दिली आहे. अंधेरी ते आंतरराष्ट्रीय विमानतळ हा एलिव्हेटेड आणि भुयारी मार्ग असणार आहे. ३.२ किं. मी. लांबीचा असणारा अंधेरी ते आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी-२) ह्या मेट्रो प्रकल्पात सुमारे २.११ किलोमीटरचा पट्टा हा भुयारी असणार आहे. या मार्गात एकूण ११ स्थानके असून त्यातील १ स्थानक हे भुयारी असणार आहे.

दहिसर ते मीरा भाईंदर आणि अंधेरी ते टी-२ टर्मिनल या दोन्ही प्रकल्पांचा प्रस्ताव नगर विकास विभागाला सादर करण्यात आला होता. नगर विकास विभागाने या दोन्ही प्रकल्पांना मान्यता दिली आहे.

या प्रकल्पांचा खर्च सुमारे ६,६०७ कोटी रूपये आहे. हे प्रकल्प मार्च २०२० पर्यंत उभारून पूर्ण होणार आहेत. कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो – ३ देखील २०२२ पर्यंत पूर्ण होणार आहे.

First Published on: November 10, 2018 2:43 PM
Exit mobile version