उल्हासनगरात पुढील सहा महिने मिशन कोरोना!

उल्हासनगरात पुढील सहा महिने मिशन कोरोना!

कोरोनाच्या संसर्गाने सर्वत्र जाळे पसरवले आहे. यावर मात करण्यासाठी किंबहूना कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी पुढील सहा महिने हे ऑपरेशन ओन्ली कोरोनाच यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे, असा निर्धार उल्हासनगर महानगरपालिकेचे नवआयुक्त समीर उन्हाळे यांनी केला आहे. उन्हाळे यांनी पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेले सुधाकर देशमुख यांच्या जागी पदभार स्विकारला आहे.

उपायुक्त मुख्यालय संतोष देहरकर यांची देखील बदली वसई-विरार महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली झाली आहे. त्यांचा पदभार उपायुक्त मदन सोंडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. समीर उन्हाळे यांनी आज दिवसभर सर्व प्रमुख अधिकाऱ्यांसोबत वेगवेगळ्या आढावा बैठकी घेऊन परिस्थितीचे गांभिर्य बघून रुग्णांची संख्या कशी कमी करता येईल. त्यासाठी कशाप्रकारे जनजागृती करावी, कोणकोणत्या उपाययोजना राबवाव्यात यावर काम करताना येत्या सहा महिन्यात मिशन ओन्ली कोरोनाच असा निर्धार व्यक्त केला.

यावेळी मुख्यालय उपायुक्त मदन सोंडे, मुख्यलेखाधिकारी विकास चव्हाण, मुख्यलेखा परिक्षक मंगेश गावडे, चार प्रभागांची जबाबदारी हाताळणारे  सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, अजय एडके, भगवान कुमावत, तुषार सोनवणे, जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास मोहनाळकर, डॉ. राजा रिझवानी, पाणी पुरवठा अभियंता चंद्रगुप्त सोनवणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे महेश सितलानी, संदीप जाधव, तरुण सेवकानी, अश्विनी आहुजा, विद्युत अभियंता हनुमंत खरात, मुख्य स्वच्छता अधिकारी विनोद केणी, एकनाथ पवार आदी उपस्थित होते.

First Published on: May 21, 2020 7:22 PM
Exit mobile version