मिशन इलेक्शन

मिशन इलेक्शन

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने तयारीला सुरूवात केली आहे. यासाठी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. शक्तीच्या माध्यमातून संघटनेच्या बांधणीचं काम पक्षाने हाती घेतलं आहे. शक्ती अ‍ॅपची माहिती स्थानिक पदाधिकार्‍यांपर्यंत पोहचविण्यासाठी शनिवारी डोंबिवलीत मेेळावा पार पडला. यावेळी अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव बी. एम. संदीप यांनी पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन केलं. शक्ती अ‍ॅपच्या माध्यमातून प्रत्येक गावागावात काँग्रेस कार्यकर्ते जोडा व पक्षाची ताकद वाढवा. असे आवाहन संदीप यांनी केलं.

काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या शक्ती अ‍ॅपची माहिती देण्यासाठी डोंबिवलीतील सर्वेश सभागृहामध्ये प्रमुख पदाधिकार्‍यांचा मेळावा पार पडला. त्यावेळी मार्गदर्शन करताना संदीप म्हणाले की, शक्ती अ‍ॅपच्या माध्यमातून काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांना काँग्रेस कार्यकत्यांशी थेट संवाद साधता येणार आहे. प्रत्येक कार्यकत्यांनी नागरिकांपर्यंत पोहचावे आणि त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. तसेच पक्षाने देशाच्या उभारणीसाठी दिलेल्या योगदानाची माहिती द्यावी. त्यामुळे सर्वसामान्यासंह पक्षाच्या कार्यकत्यांनी शक्ती अ‍ॅप डाऊनलोड करावे असे आवाहन संदीप यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर त्यांनी कडाडून टीका केली. आधार कार्डसह सुरू असलेल्या योजना काँग्रेसच्या काळातील असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यकत्यांनी आपसातील मतभेद बाजूला सारून एकदिलाने काम करावे. असे आवाहनही त्यांनी केलं. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

First Published on: September 30, 2018 1:56 AM
Exit mobile version