MMRDA चं कौतुकास्पद कार्य, मालाडमध्ये केवळ ६० दिवसांत उभारले २१७० बेड्सचं कोविड रुग्णालय

MMRDA चं कौतुकास्पद कार्य, मालाडमध्ये केवळ ६० दिवसांत उभारले २१७० बेड्सचं कोविड रुग्णालय

MMRDA चं कौतुकास्पद कार्य, मालाडमध्ये केवळ ६० दिवसांत उभारले २१७० बेड्सचं कोविड रुग्णालय

कोरोना काळात एमएमआरडीने अवघ्या दोन महिन्यातंच मालाडच्या वलनाई गाव येथे तब्बल २१७० खाटांचे कोविड रुग्णालय उभारत कौतुकास्पद काम केले आहे. या रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर एमएमआरडीएने ते सोमवारी मुंबई महानगरपालिकेकडे सुपूर्त केले आहे. हे कोविड-१९ रुग्णालय जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून बनविण्यात आले असून ते अग्निरोधक आणि पर्यावरणास अनुकूल आहे. या ठिकाणी २१७० खाटांच्या कोविड रूग्णापैकी ७० टक्के चांगले ऑक्सिजन बेडस व २०० आयसीसीयू बेड असणार आहे.

तसेच रूग्णालयात १९० बेडचे इंटेन्सिव्ह केअर युनिट, ऑक्सिजन सुविधायुक्त १५३६ बेड्स, मुलांसाठी इंटेन्सिव्ह केअर युनिट, २० बेडचे डायलिसिस युनिट, ४० बेडचे ट्रायजेज आणि ३८४ बेडस विलगीकरण रूम असून एकूण २१७० बेडस आहेत. याव्यतिरिक्त, हेमॅटोलॉजी आणि बायोकेमिस्ट्रीसाठी पॅथॉलॉजी प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली असून पोर्टेबल एक्स-रे, सीटी स्कॅनर, ईसीजी मशीन या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा रुग्णालयात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

यासोबत लिक्विड ऑक्सिजनच्या ४ टाक्या बसविण्यात आल्या आहेत. एमएमआरडीएने २४० सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आले आहेत. रूग्णाच्या नातेवाईकांसाठी रुग्णालयात माहिती कक्ष सुरू करण्यात आला आहे. डॉक्टर आणि प्रशासकीय कामांसाठी एक खोली तयार करण्यात आली असून तेथे उत्कृष्ट सुविधा पुरविल्या गेल्या आहेत. या रुग्णालयाचा पाया तळ मजल्यापासून १० इंच उंच आहे आणि स्टीलच्या फ्रेम, डबल प्लायवुड आणि पीव्हीसी फ्लोअरिंगपासून बनलेला आहे. तसेच, नामांकित कंपन्यांकडून रुग्णालयासाठी वैद्यकीय उपकरणे आणि पुरवठा करण्यात आला आहे.

रुग्णालयाच्या बांधकामासाठी तब्बल ५८ कोटींचा खर्च

रुग्णालयाचे बांधकाम तातडीने होणे आवश्यक असल्याने कामाची अंदाजे किंमत ९० कोटी रुपये असून त्यापैकी ५७ कोटी रुपये रूग्णालयाच्या बांधकामावर खर्च झाला असून सुमारे ३३ कोटी रुपयांची वैद्यकीय उपकरणे खरेदीसाठी खर्च करण्यात आले आहे. एकूण खर्च ८९.६४ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. परिस्थितीची निकड लक्षात घेता प्रत्येक कामासाठी स्वतंत्र किंमतीचा अंदाज आणि निविदा कागदपत्रे तयार करण्यात आली होती आणि २९ एप्रिलला एमएमआरडीएच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आली आणि २४ मे रोजी कंत्राटदारांना कामाचे कार्यादेश देण्यात आले.


 

First Published on: June 29, 2021 11:45 AM
Exit mobile version