अखेर वेस्टर्न रेल्वे लाईनवर तो गर्डर टाकलाच

अखेर वेस्टर्न रेल्वे लाईनवर तो गर्डर टाकलाच

एम एम आर डी ए मेट्रो लाईन 2A दहिसर पूर्व ते डी एन नगर या दरम्यान बांधत आहे. या बांधणीत सर्वात कठीण टप्पा पश्चिम रेल्वे मार्गावरील दहिसर आणि मीरा रोड या रेल्वे स्थानकांदरम्यानच्या रेल्वे रुळांवर लोखंडी तुळया उभारण्याचे अत्यंत कठीण टप्पा एम एम आर डी ए ने यशस्वीपणे पार पाडून आपल्या यशाच्या शिरपेचात नवा तुरा खोवला. एम एम आर डी ए पश्चिम रेल्वे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी गेली दोन वर्षे सातत्याने पाठपुरावा केलेल्या कामाला यश आले. मेट्रोच्या ट्रायच्या कामासाठी हे काम पुर्ण होणे गरजेचे होते. नियोजित वेळेपेक्षा दोन महिने आधीच हे काम पुर्ण करण्यात यश मिळाले आहे.

गर्डर टाकण्यासारखी बांधकामे पावसाळ्यात केली जात नाहीत. परंतु एम एम आर डी ए ने केलेल्या विनंतीला महानगरपालिकेने सकारात्मक प्रतिसाद देऊन विशेष परवानगी दिल्याने व्ही एच देसाई नाला आणि अवधुतनगर नाला यादरम्यान सांडपाण्याचे भूमिगत पाईप टाकता आले. यामुळे या कामासाठी क्रेन उभारणे शक्य झाले. पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांनी जि ए डी, रचनात्मक आकृत्या, उभारणीची कार्यपद्धती आणि रहदारी थांबवणे यासाठी विशेष परवानग्या देऊन सहकार्य केले. या संदर्भातील आलेखने व आकृती या गोष्टींचे अनेक टप्प्यांवर पुनरावलोकन झाले व मंजुरी देण्यात आली. क्रेन, प्रतिरोध भार, आणि गर्डर या सर्वाचा भार पेलला जावा म्हणून NP-4 पाईप्स भूमिगत बोगद्यासाठी वापरण्यात आले. २० ते २२ सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हा सारा भाग चिखलमय झाला होता. त्यामुळे हा भूभाग पोकळ राहू नये म्हणून येथे जाड आणि बारीक खडीचे मिश्रणाचा भराव टाकण्यात आला आणि ही क्रेनचे वजन पेलण्यास सक्षम करण्यात आली.

हे काम मध्यरात्रीच्या १२.०५ पासून पहाटे ३.३५ वाजेपर्यंत रहदारी आणि वीजपुरवठा बंद ठेऊन ५०० मेट्रिक टन आणि ३०० मेट्रिक टन क्षमतेच्या दोन क्रेन वापरून आणि आणीबाणीच्या परिस्थितीत वापरण्यासाठी ४०० मेट्रिक टन क्षमतेची एक अतिरिक्त क्रेन यांच्या साहाय्याने करण्यात आले. 8 मॅनलिफ्टर, 3 पीक आणि दोन कॅरी क्रेन, 50MT क्रेन्स आणि चार मल्टि एक्सल ट्रेलर्सही हे काम करण्यासाठी या काळात तैनात केले होते. गर्डरचा प्रीकास्ट पोस्ट टेन्शन कॅप्सवर ठेवण्यात आल्या. जेव्हा रेल्वे गाड्या बंद असतील तेव्हा येणाऱ्या अतिरिक्त भराला सहन करण्यास ही अधिरचना सक्षम असेल. सर्व्हिस रोडवरील दहिसर उड्डाण पुलाच्या बाजूची सुमारे १२०० मीटर मेट्रो लाईन आणि त्याचे थांबे आशा प्रकारे बांधण्यात आले आहेत की त्यातील अंतर केवळ ४०० ते ५०० मिलीमीटरचे ठेवले आहे. जेणे करून सर्व्हिस रोडचा कमीतकमी भाग मेट्रोसाठी वापरला जाईल. आय आर सी मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून मेट्रो थांब्यांचा खालील भाग उड्डाणपुलापासून ५.५ मीटर उंच ठेवण्यात आला आहे.

अनेक अडचणी असतानाही, तसेच सतत पाऊस असतानाही आम्ही हे कार्य वेळेआधी पूर्ण करू शकलो याचा आम्हाला आनंद वाटतो, असे महानगर आयुक्त आर ए राजीव म्हणाले. दहिसर गर्डरची उभारणी नोव्हेंबरमध्ये होणे अपेक्षित होते. पण आम्ही हे कार्य निहित वेळेच्या दोन महिने आधी पूर्ण केले. एम एम आर डी ए आता मेट्रो लाईन 2 A च्या चाचण्या, ज्या जानेवारी २०२१ ला सुरू होणार आहेत, त्यात एक पाऊल पुढे गेली आहे. हे सारे रेल्वे आणि मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे शक्य झाले.


 

First Published on: September 28, 2020 12:35 PM
Exit mobile version