मेट्रोतून थेट मॉलमध्ये, एमएमआरडीए देणार सुविधा

मेट्रोतून थेट मॉलमध्ये, एमएमआरडीए देणार सुविधा

मेट्रोमधून थेट मॉलमध्ये कनेक्टिव्हिटी

शेवटच्या मैलांपर्यंतची कनेक्टिव्हिटी देण्यासाठी विकासकांकडून आज एमएमआरडीएने आयोजित कार्यशाळेत अभिप्राय घेण्यात आले. त्याचबरोबर नवीन कल्पना, सूचना, डिझाइन, बांधकाम, याबाबतच्या शंका ओ अँड एम व्यवस्था, अटी व शर्ती आणि इतर कार्यपद्धतींवर निर्णय घेण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. मेट्रो लाईन 2Aआणि मेट्रो लाईन 7 पूर्ण होण्याच्या टप्यात आहेत. २०२० च्या अखेरीस या दोन्ही मेट्रो लाईन्स कार्यान्वित होतील. भविष्यात जे मेट्रो प्रकल्प पूर्णत्वाच्या जवळ येतील त्यावेळी अशाच कार्यशाळा आयोजित केल्या जातील. एमएमआरडीएने मंगळवारी आयोजित केलेल्या मुंबई मेट्रो लाईन 2A आणि लाइन 7 साठी शेवटच्या मैलांपर्यंतच्या कनेक्टिव्हिटीवरील कार्यशाळेत अनेक खासगी विकासकांना संबोधीत केले.

मेट्रो स्थानकांवरील सर्वांगीण प्रवेश सुधारण्यासाठी प्राधिकरणाने मेट्रो मार्गांसाठी ‘मल्टी-मॉडेल एकत्रीकरण’ (एमएमआय) देखील सुरू केले आहे. ३० जानेवारी २०२० रोजी दोन कॉरिडॉरसमवेत चार वेगवेगळ्या पॅकेजेसमध्ये प्रकल्प व्यवस्थापन योजनांच्या अंमलबजावणीसाठी कंत्राटदार आणि दोन पॅकेजेसमध्ये प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. योजनांच्या अंमलबजावणीसाठी पॅकेज १ आणि २ मध्ये ८ स्थानकांचा समावेश आहे. त्याच्या प्रत्येकी निविदा खर्च ८२.५५ कोटी आणि ९८.१५ कोटी आहे तर पॅकेज ३ आणि ४ मध्ये ७ स्थानकांचा समावेश आहे. ज्याचा निविदा खर्च अनुक्रमे ९१.०४ कोटी आणि ८५.१२ कोटी आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सीनुसार दोन पॅकेजेस हे १५ स्थानकांसाठी असतील.

एमएमआरडीएचे महानगर आयुक्त  आर. ए. राजीव म्हणाले की मॉल आणि व्यावसायिक संकुलांमध्ये थेट प्रवेश करणे लोकांसाठी तसेच विकासकांसाठीही फायदेशीर ठरेल. “दोन्हीकडून हा प्रवास सोईस्कर होईल. आमचा उद्देश हा प्रवाशांची सोय योग्य पद्धतीने करणे हा आहे. शहराच्या भल्यासाठी ही सार्वजनिक सुविधा उपलब्ध आहे.
पहील्या आणि शेवटच्या मैलाच्या कनेक्टिव्हिटीद्वारे शहर सजग करण्याची आमची कल्पना आहे. ”

मेट्रो मार्गिका दाट शहरी भागांमधून जात असताना आणि मेट्रो स्थानके सामान्यत: निवासी आणि व्यावसायिक विकास क्षेत्राच्या अगदी जवळ असतात. त्यामुळे मेट्रो स्थानकांपासून शेजारच्या क्षेत्रापर्यंत शेवटची मैल जोडण्याची संधी मिळते जी रस्ते सजवण्यासाठी मदत करेल. एमएमआरडीएने वाहतूक आणि ट्रॅफिकची स्थिती सुधारण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केला आहे. त्यासाठी एमएमआर रिजनमधील १ किमी अंतरावर मेट्रो सिस्टम उपलब्ध होईल.  एमएमआरडीएने २२५ हून अधिक स्थानकांसह ३३७ किमी पेक्षा जास्त 14 लाइनच्या मेट्रो नेटवर्कची योजना आखली आहे. पुढील तीन ते चार वर्षात या नेटवर्क कार्यरत होईल.

First Published on: March 3, 2020 7:27 PM
Exit mobile version