स्विमिंग पूल सुरू करा, दादर – माहीमचे रहिवाशी महापौरांच्या भेटीला

स्विमिंग पूल सुरू करा, दादर – माहीमचे रहिवाशी महापौरांच्या भेटीला

स्विमिंग पूल सुरू करा, दादर - माहीमचे रहिवाशी महापौरांच्या भेटीला

महात्मा गांधी स्विमिंग पूल सुरु करण्याच्या मागणीसाठी आज मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासह दादर माहीममधील रहिवाश्यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी महापौरांना स्विमिंग पूल सुरु करण्यासाठीचे निवेदन सादर केले. यावेळी बोलताना महापौर किशोरी पेडणेकर यांनी दादर- माहिम रहिवाश्यांच्या जलतरण तलाव खुले करण्याच्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्र्य़ांशी बोलून लवकरात लवकरं निर्णय घेऊ असे आश्वासन दिले आहे.

 लसीचे दोन डोस घेतल्यांसाठी येत्या काही दिवसांत सर्व गोष्टी सुरु करू 

यावेळी बोलताना महापौर म्हणाल्या की, आश्वासन देण्यापेक्षा कृती करणं जास्त महत्त्वाचं वाटतं. कारण इथे आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळून आलेली , कोणी सुवर्ण पदक जिंकलेली मुलं येत असतात. त्यांची शनिवार, रविवार, सोमवार आणि पुढच्या महिन्य़ामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी स्पर्धा आहे. या विद्यार्थ्यांचे निवेदन मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी मला दिले. यानंतर विभागातील एएमसी अश्विनी भिडे यांच्याशी बोलले. यावर त्याही म्हणाल्या की, या प्रश्नावर आपण सरकारशी बोलू आणि पत्र देऊ. असे म्हणत त्यांनी गणेशोत्सवानंतरची कोरोना स्थिती पाहता लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी येत्या काही दिवसांमध्ये सर्व गोष्टी लवकरचं सुरु केल्या जातील. अशी माहिती दिली आहे. मात्र नागरिकांना मास्क वापरणं अनिवार्य असणार आहे असंही त्यांनी सांगितले.


दादर- माहिम रहिवाश्यांच्या जलतरण तलाव खुले करण्याच्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्र्य़ांशी बोलू. शिवाजी पार्कमध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू खेळतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून यासंदर्भात निर्णय आला की, पालिकेकडून दिलेली एसओपी फॉलो करुन घेणं. त्यानंतर तेथे लागणारं पाणी आणि सर्व गोष्टी तयार करु. या रहिवाश्यांच्या रास्त मागण्या महानगर पालिका आणि राज्य सरकारकडून पूर्ण करत असताना कोरोनाच्या गणेशोत्सवानंतरच्या संकटाची येत्या एक दोन दिवसात चाचपणी करु. असेही महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.


 

First Published on: September 21, 2021 11:45 AM
Exit mobile version