रेड्डीज लॅबकडून लस घेण्यासाठी मध्ये दलाल कशासाठी? मनसेचा पालिकेला सवाल

रेड्डीज लॅबकडून लस घेण्यासाठी मध्ये दलाल कशासाठी? मनसेचा पालिकेला सवाल

मुंबईला हव्या असलेल्या लसीचा मुबलक पुरवठा करण्यासाठी पालिकेने काढलेल्या ग्लोबल टेंडरला १० कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबई महानगर पालिकेला सवाल केला आहे. पालिकेच्या टेंडरला ज्या कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे, त्या कंपन्या डॉ. रेड्डीज लॅबकडून लस खरेदी करून पालिकेला देणार आहेत. यावरून संदीप देशपांडे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

संदीप देशपांडे यांनी एक ट्विट केलं आहे. “मुंबई महानगर पालिकेने ग्लोबल टेंडर काढले. ८ ते ९ कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला. हे कंत्राटदार डॉक्टर रेड्डीज लॅबकडून लस खरेदीकरून पालिकेला देणार. मग पालिका थेट रेड्डीजकडून लस का घेत नाही? मधले दलाल कशासाठी?” असं सवाल संदीप देशपांडे यांनी ट्विटद्वारे केला आहे.

लस पुरवठ्याबाबत स्पष्टता नाही – पालिका

लस पुरवठ्याबाबत उत्तर देताना पालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी ग्लोबल टेंडरला ११ जणांनी प्रतिसाद दिला असून त्यापैकी एकाने माघार घेतल्याचे सांगितले. तसेच १० पैकी एकाही लस उत्पादक कंपनीचा प्रस्ताव आलेला नाही. या सर्व निविदाकारांनी स्पुटनिक लस वितरणाचा दावा केला आहे. परंतु, अद्याप एकही निविदाकार लस उत्पादकाबरोबर लस पुरवठ्याबाबत केलेल्या करारनाम्याची प्रत देऊ शकलेला नाही. त्यामुळे लसीचा पुरवठा नेमका कसा होणार याची अद्याप स्पष्टता झालेली नाही. प्रशासन याबाबत दोन ते तीन दिवसात अंतिम निर्णय घेणार आहे, अशी माहिती वेलारासू यांनी दिली असल्याचे प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.

First Published on: June 3, 2021 10:28 AM
Exit mobile version