अधिकाऱ्यांना धुतल्याशिवाय काम होणार नाही का? मनसे आमदाराचा संतप्त सवाल

अधिकाऱ्यांना धुतल्याशिवाय काम होणार नाही का? मनसे आमदाराचा संतप्त सवाल

राजू पाटील मनसे आमदार

मुंबई आणि ठाण्यानंतर डोंबिवली हे सर्वाधिक नागरिकरण झालेले शहर आहे. या शहराला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. मात्र दुसरीकडे रस्ते, प्रदूषण, वाहतूक व्यवस्था अशा समस्यामुळे डोंबिवलीकर नागरिक त्रस्त झालेले आहेत. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ‘पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना ट्विटरवर टॅग करत प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांना धुतल्याशिवाय काहीही होणार नाही का?’ असा संतप्त सवाल राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे.

डोंबिवली येथील एमआयडीसीतील कंपन्या रसायनयुक्त पाणी रस्त्यावरच सोडत आहेत. त्यामुळे रस्त्यांवर निळे रंग दिसू लागला आहे. या घटनेमुळे डोंबिवलीकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याविरोधात राजू पाटील यांनी आवाज उचलला असून त्यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना जाब विचारला आहे.

 

First Published on: November 27, 2020 3:10 PM
Exit mobile version