राज ठाकरेंच्या ईडी चौकशीवरून मनसेच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची आत्महत्या

राज ठाकरेंच्या ईडी चौकशीवरून मनसेच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची आत्महत्या

राज ठाकरेंच्या ईडी चौकशीवरून मनसेच्या निष्ठावंत कार्कर्त्याची आत्महत्या

कोहिनूर मिल खरेदी प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली आहे. २२ ऑगस्ट रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी उभे राहावे, असे आदेश‌ ईडीकडून देण्यात आले आहेत. मात्र, ईडी चौकशीच्या आधीच ठाण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मनसेचा निष्ठावंत कार्यकर्ता प्रवीण चौगुलेने स्वःला जाळून घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना मंगळवारी रात्री उशिराने ठाण्यात घडली. राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठवल्यामुळे आपण आत्महत्या करत आहोत, असे प्रवीणने आपल्या मित्रांना आत्महत्येपूर्वी सांगतले होते. राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावल्यामुळे तो प्रचंड तणावात गेला होता. त्याने सोशल मीडियावर देखील तशाप्रकारचे पोस्ट टाकले होते. अखेर प्रचंड तणावाखाली त्याने रात्री उशिरा आत्महत्या केली.

प्रवीण हा राज ठाकरेंचा प्रचंड चाहता होता. तो मनसेचा निष्ठावंत कार्यकर्ता होता. त्यामुळे मनसेचा कोणताही कार्यक्रम असो किंवा आंदोलन असो, तो स्वतःच्या शरीरावर मनसेचा झेंडा रंगवून कार्यक्रमात सर्वात पुढे असायचा. प्रवीणच्या जाण्याने मनसेने फार मोठा निष्ठावंत कार्यकर्ता गमवला आहे.

ईडी चौकशीवरुन राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला होता. राज यांनी यासंदर्भात एक पत्रक देखील जारी केले होते. या पत्रकामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी ‘तुम्हाला डिवचण्याचा प्रयत्न होईल, पण शांत रहा! लोकांना त्रास होईल असे कोणतेही कृत्य करू नका’, असे आवाहन केले होते. दरम्यान, ईडीने दिलेली नोटीस मनसैनिकांना जिव्हारी लागली आहे. राज ठाकरे म्हणजे आपले आराध्य दैवतच अशी भावना कार्यकर्त्यांची आहे. यातूनच प्रवीण चौगुले या तरुणाने आत्महत्या केली. ही फार अत्यंत दु:खद आणि धक्कादायक आहे.


हेही वाचा – शांत रहा !,राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आदेश

First Published on: August 21, 2019 7:50 AM
Exit mobile version