सावित्रीबाई फुले नाट्यगृह सुरु करण्याकरता मनसेचा पालिके विरोधात निषेध

सावित्रीबाई फुले नाट्यगृह सुरु करण्याकरता मनसेचा पालिके विरोधात निषेध

मनसेचा पालिका विरोधात निषेध

डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह गेल्या चार महिन्यांपासून दुरुस्तीसाठी बंद करण्यात आले आहे. हे नाट्यगृह लवकरात लवकर सुरु करण्यासाठी अनेकदा मागण्या करण्यात आल्या. मात्र त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याने अखेर आज मनसेकडून आगळ्या वेगळ्या पद्धतीने कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

नाट्यगृहाचे काम दहा दिवसात होणार सुरू

सावित्रीबाई फुले नाट्यगृह चालू करण्यासाठी मनसेने नाट्यमंचावर धुमाकूळ घालणाऱ्या सुप्रसिद्ध कलाकृतींच्या वेशभूषेत अवतर त्यांनी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाचा निषेध केला आहे. महापालिका प्रशासनाच्या वेळकाढूपणाचा निषेध करीत नाट्यगृह लवकरात लवकर सूर करण्याची यावेळी मागणी करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासन मनसेच्या आक्रमक भूमिकेपुढे नमले असून येत्या दहा दिवसात दुरुस्तीचे काम सुरू करणार असे लेखी उत्तर महापालिका प्रशासनाने मनसेला दिले आहे. यावेळी शहर अध्यक्ष राजेश कदम, महिला शहर अध्यक्षा मंदाताई पाटील, पालिका गटनेते मंदार हळबे, जिल्हा संघटक राहुल कामत, उपजिल्हा अध्यक्ष सुदेश चुडनाईक, विद्यार्थी सेना डोंबिवली शहर सागर जेधे, दिपक शिंदे, राजू पाटील, सचिन कस्तुर, समिर करंबेळकर, प्रथमेश खरात, केतन सावंत आणि इतर पदाधिकारी कर्यकर्ते उपस्थित होते.

असा केला आगळ्या वेगळ्या पद्धतीने निषेध

मनसे कार्यकर्त्यांनी नटसम्राट, लखोबा लोखंडे, लाल्या (काशीनाथ घाणेकर) अलबत्या गलबत्या चेटकीण, भीम, चिमणराव इत्यादी कलाकारांच्या वेशात येवून पालिकेला चांगलेच धारेवर धरले आहे.


वाचा – मुख्यमंत्र्यांना कल्याण मनसेचा गाजराचा केक!

वाचा – मनसेकडून महपौरांचा निषेध


First Published on: December 28, 2018 6:32 PM
Exit mobile version