‘मनविसे’च्या पुनर्बांधणीला सुरूवात; अमित ठाकरेंकडून नव्या चेहऱ्यांना संधी

‘मनविसे’च्या पुनर्बांधणीला सुरूवात; अमित ठाकरेंकडून नव्या चेहऱ्यांना संधी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे यांच्यावर पक्षाने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर अमित ठाकरेंनी कामाला सुरूवात केली आहे. त्यानुसार, अमित ठाकरे यांनी पहिल्याच टप्प्यात विद्यार्थी सेनेचे ७ विभाग अध्यक्ष बदलले. तसेच, निवडक ठिकाणी विभाग अध्यक्षांची फेरनिवड केली आहे. (mnsu president amit thackeray appoints office bearers in some assembly constituencies)

नव्या विभाग अध्यक्षांपैकी बहुतेक पदाधिकारी हे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या दुसऱ्या फळीत असून, नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. अमित ठाकरे यांनी १५ विधानसभेतील मनविसेच्या १५ विभाग अध्यक्षांपैकी ७ विभाग अध्यक्ष बदलले आहेत.

३ जणांची फेर निवड केली, तर उर्वरित ५ विधानसभा साठीच्या नेमणुका पुढच्या आठवड्यात करण्यात येणार आहे. दरम्यान, अमित ठाकरे मागील काही दिवसांत मुंबईतील १५ विधानसभा मतदारसंघातील मनसे पक्ष कार्यालयांना भेट दिली. शिवाय, मनविसेच्या पदाधिकारी आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

मनविसे पुनर्बांधणी संपर्क अभियान मुंबईतील एकूण ३६ विधानसभा मतदासंघामध्ये राबवण्यात येत आहे. तसेच, प्रत्येक विभागात अमित यांना किमान २०० पेक्षा अधि विद्यार्थी भेटायला येत असल्याची माहिती मिळते.

मनविसेचे विभाग अध्यक्षपदी फेरनिवड झालेले उमेदवार


हेही वाचा – १८ जूनपासून राज्यात मान्सून सक्रीय होणार; हवामान विभागाचा अंदाज

First Published on: June 16, 2022 9:17 PM
Exit mobile version