मान्सून लांबला! दोन दिवस उशिरा केरळमध्ये आगमन

मान्सून लांबला! दोन दिवस उशिरा केरळमध्ये आगमन

दरवर्षीप्रमाणे केरळमध्ये मान्सूनचे 1 जूनला होणारे आगमन यंदा लांबले आहे. आता दोन दिवस उशिरा म्हणजे 3 जूनला केरळात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. नैऋत्य मौसमी वार्‍यांचा प्रवाह 1 जूनपासून जोर धरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 5 दिवसात केरळात काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रातही पुढील 4-5 दिवस मान्सून पूर्व पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मान्सूनच्या वाटचालीत कोणतीही प्रगती नसल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

पावसाचे सोमवारी दक्षिणेकडील किनारपट्टीवर आगमन होण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. केरळच्या किनारपट्टीच्या दक्षिणेकडील भागावर उद्या पावसाळा सुरू होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता विभागाने आपल्या ताज्या अंदाजानुसार व्यक्त केली आहे. जवळपास निम्म्या शेतजमिनीत सिंचन नाही आणि तांदूळ, कॉर्न, ऊस, कापूस आणि सोयाबीनची पिके घेण्यासाठी जून ते सप्टेंबरच्या वार्षिक पावसावर अवलंबून असतो. या पिकांसाठी पावसाचे वेळेवर आगमन महत्त्वाचे ठरते.

केरळात मान्सून उशिरा दाखल होणार असल्याचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवणार आहे. कोकणातही आता दोन दिवस उशिरा मान्सूनचे आगमन होणार आहे. कोकणात मान्सून 10 जूनला दाखल होईल तर मुंबईत 12 पर्यंत पोहोचणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

First Published on: May 31, 2021 12:19 AM
Exit mobile version