मुंबईतील ३५ हून अधिक खासगी केंद्र लसीअभावी बंद

मुंबईतील ३५ हून अधिक खासगी केंद्र लसीअभावी बंद

corona vaccination: कोरोनामुक्त झालेल्या नागरिक ९ महिन्यानंतर घेऊ शकतात लस, NTAGI चा सल्ला

राज्यासह मुंबईत कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठ्या संख्येने वाढ होताना दिसत आहे. एकीकडे कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ होत आहे. तर दुसरीकडे ऑक्सिजनसह आता लसीकरणाचा देखील तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. कोरोना संसर्ग होत असताना लसीकरण करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र, अपुऱ्या लसीच्या साठ्यामुळे आता मुंबईतील ३५ हून अधिक खासगी लसीकरण केंद्र बंद करण्यात आली आहेत. यामध्ये चेंबूर परिसरातील सुश्रुत रुग्णालयाचा देखील समावेश आहे. आज याठिकाणी अनेक जण लसीकरणासाठी गेले होते. मात्र, अपुऱ्या लसीच्या साठ्यामुळे हे केंद्र बंद करण्यात आले.

राज्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे दिसत आहे. मात्र, दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीमुळे आता रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असताना आता पुन्हा एकदा लसीकरणाचा देखील तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे मुंबईतील तब्बल ३५ हून अधिक लसीकरण केंद्र बंद करण्यात आली आहेत. यामध्ये चेंबूर परिसरातील सुश्रुत रुग्णालयाचा देखील समावेश आहे. सुश्रुत रुग्णालयात आज अनेक नागरिक लसीकरणासाठी दाखल झाले होते. मात्र, रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर लस संपल्याचा बोर्ड लावण्यात आला होता. त्यामुळे अनेक नागरिकांना लस संपलेल्याचा बोर्ड पाहून घरी परतावे लागले. तसेच ज्यावेळी साठा उपलब्ध होईल त्यानंतर पुन्हा एकदा लसीकरणाला सुरुवात होईल, असे सांगण्यात आले. मात्र, लसीचा साठा केव्हा उपलब्ध होणार, याची अद्यााप कोणतीही माहिती मिळालेली नाही.


हेही वाचा – सिक्स मिनिट वॉक टेस्ट काय आहे? कोरोना झाल्यावर ती का गरजेची?


 

First Published on: April 19, 2021 6:11 PM
Exit mobile version