कोकणकड्यावरून पडून गिर्यारोहक अरूण सावंत यांचा मृत्यू

कोकणकड्यावरून पडून गिर्यारोहक अरूण सावंत यांचा मृत्यू

रॅपलिंग करताना हरिश्र्चंद्र गडावर गिर्यारोहकाचा मृत्यू झाला आहे. हरिश्र्चंद्रगडावरील कोकण कड्यावरून पडून गिर्यारोहक अरूण सावंत यांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास बेपत्ता झाले. तेव्हापासून त्यांचा शोध सुरू होता. अखेर त्यांचा मृतदेह सापडला.

अरुण सावंत गोरेगावमधील नामवंत गिर्यारोहक, सह्याद्रीची घोरपड म्हणून ओळखले जातात. काल, हरिश्चंद्रगडावरील कोकणकड्यावरील मोहिमेत अपघाती मृत्यू झाला. या मोहिमेत ३० जण सहभागी झाले होते. सावंत हे मोहिमेचे प्रमुख होते. रोप फिक्सिंग करताना अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ध्येयवेडे गिर्यारोहक अरुण सावंत यांचा गिर्यारोहण करताना झालेला अपघाती मृत्यू धक्कादायक आणि क्लेशदायक आहे. गिर्यारोहण लोकप्रिय करण्यात त्यांचं योगदान सदैव लक्षात राहील. सह्याद्रीचा हा सुपुत्र आज अखेर सह्याद्रीच्या कुशीतच विसावला. सह्याद्रीच्या डोंगरकपारीत फिरणारा हा फिरस्ता आज अखेरच्या प्रवासाला चालला आहे यासारखे दुःख नाही. अरुण सावंत अनेक गिर्यारोहकांचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान होते. त्यांच्या कार्य व स्मृतींना श्रद्धांजली…
– अजित पवार, उपमुख्यमंत्री..

First Published on: January 19, 2020 3:36 PM
Exit mobile version