विद्यापीठाविरोधात 22 मार्च रोजी बुक्टूचे धरणे आंदोलन

विद्यापीठाविरोधात 22 मार्च रोजी बुक्टूचे धरणे आंदोलन

विद्यापीठ अनुदान आयोगाचे संकेत

सातव्या वेतन आयोगाच्या परिपत्रकानुसार विद्यापीठाने वेतन निश्चिती करावी. तसेच वेतन निश्चितीसाठी विद्यापीठाने वेळापत्रक तयार करण्याबरोबरच विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराविरोधात बुक्टू संघटना शुक्रवारी धरणे आंदोलन करणार आहे. विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमध्ये होणारे हे आंदोलन 12 तासांचे दीर्घ आंदोलन असणार आहे.

विद्यापीठ प्रशासनाने वेतन निश्चितीसाठी वारंवार आश्वासने देऊनही त्यांची पूर्ती होत नाही. मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेत्रात चार हजारांपेक्षा अधिक प्राध्यापक असल्याने त्यांच्यासाठी शिबिर भरवणे विद्यापीठाला शक्य होईल का, असा प्रश्न बुक्टूकडून उपस्थित करण्यात येत आहे. तसेच विद्यापीठ परिनियमातील रजा नियमांचे उल्लंघन करणार्‍या प्राचार्यांवर विद्यापीठाने अद्यापही कारवाई केलेली नाही. या निषेधार्थ बुक्टूच्या वतीने 22 मार्चला सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत 12 तासांचे दीर्घ धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. प्राध्यपकांंच्या प्रश्नांकडे विद्यापीठाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनात प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बुक्टूचे अध्यक्ष डॉ. गुलाब राजे व महासचिव डॉ. मधू परांजपे यांनी केले.

First Published on: March 22, 2019 4:08 AM
Exit mobile version