पत्रीसह दुर्गाडी पुलाविषयी विचारा थेट नेत्यांना जाब; ‘हा’ घ्या मोबाईल नंबर

पत्रीसह दुर्गाडी पुलाविषयी विचारा थेट नेत्यांना जाब; ‘हा’ घ्या मोबाईल नंबर

कल्याण पूल कोंडीवर मनसेची बॅनरबाजी

कल्याणातील पत्रीपूल आणि दुर्गाडी पुलामुळे प्रचंड वाहतूक केांडीला सामोरे जावे लागत असल्याने आता मनसेने बॅनरबाजी केली आहे. पत्रीपूल दुर्गाडी पूल कधी बांधणार? थेट नेत्यांना जाब विचारा, असे आवाहन मनसेने करीत बॅनरवर पालकमंत्री राज्यमंत्रयासह खासदार आमदारांचे फोटो आणि मोबाईल नंबरही छापण्यात आले आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेची बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे.


हेही वाचा – कल्याणच्या पत्रीपुलाने घेतला पहिला बळी


खासदार आमदारांच्या फोटोसह मोबाईल नंबर छापले

कल्याण डोंबिवली शहरातील रस्तयांची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे आधीच वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून कल्याणच्या पत्रीपूलाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. पत्रीपूल आणि दुर्गाडी पुलावर नेहमीच्याच वाहतूक केांडीला नागरिक प्रचंड कंटाळले आहेत. पत्रीपुलाच्या संथ कामाविरोधात मनसेने अनेकवेळा आंदोलन केली आहेत. आता पत्रीपुल दुर्गाडी पूल कधी बांधणार? असा सवाल करीत थेट नेत्यांना विचारा, असे आवाहन मनसेने एका बॅनरच्या माध्यमातून नागरिकांना केले आहे. या बॅनरवर पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे, कपिल पाटील, आमदार नरेंद्र पवार, सुभाष भोईर या लोकप्रतिनिधींचे फोटो आणि त्या खाली त्यांचे मोबाईल नंबर टाकण्यात आले आहेत. आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने मनसे अधिकच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. रविवारपासून डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा कोपर उडडाणपूल बंद केल्याने डोंबिवलीतही प्रचंड प्रमाणात वाहतूक केांडी होत आहे. त्यामुळे कल्याण डेांबिवलीकर सध्या वाहतूक केांडीचाच सामना करीत असल्याने नागरिकांने तीव्र संताप व्यक्त केला आहे.


हेही वाचा – कल्याणच्या पत्रीपुलासाठी नागरिकांचे भीक मागो आंदोलन


 

First Published on: September 16, 2019 5:51 PM
Exit mobile version