लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांइतके वृक्ष लावणार – राहुल शेवाळे

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांइतके वृक्ष लावणार – राहुल शेवाळे

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, दक्षिण- मध्य मुंबई मतदारसंघाचे खासदार राहुल शेवाळे यांनी एक अनोखा संकल्प केला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शेवाळे यांना एकूण ४ लाख २४ हजार ९१३ मते मिळाली होती. मतांच्या या संख्येइतकेच वृक्ष येत्या ५ वर्षांत लावण्याचे राहुल शेवाळे यांनी ठरविले आहे.

पाच वर्षांची अनोखी वृक्षरोपण चळवळ 

‘प्लांट अ होप'(Plant a Hope) अशा नावाने पुढील पाच वर्षेांसाठी वृक्षरोपणाची चळवळ उभारली जाणार आहे. या चळवळीत विविध सामाजिक संस्था सहभागी होणार आहेत. या उपक्रमाची येत्या १० जूनला महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सामाजिक संस्थांच्या उपस्थितीत खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते सुरुवात केली जाणार आहे. मुंबईतील विविध सामाजिक संस्था, शाळा-महाविद्यालये, खासगी कंपन्या, गृहनिर्माण सोसायट्या तसेच सामन्य नागरिक या सर्वांच्या माध्यमातून पाच वर्षांत हा उपक्रम राबविला जाणार आहे.

माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवून मला मत देणाऱ्या प्रत्येक मतदाराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी मला मिळालेल्या मतांइतक्या वृक्षांची लागवड करणार आहे. जागतिक हवामान बदलाच्या गंभीर समस्येला तोंड देण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा. ‘प्लांट अ होप’ या उपक्रमाच्या माध्यमातून वृक्षारोपणाची नवी चळवळ उभी राहील, अशी आशा करतो.
– राहुल शेवाळे, खासदार
First Published on: June 5, 2019 10:38 PM
Exit mobile version