दक्षिण मुंबईत इमारतीचा भाग कोसळला; १७ जणांची सुखरूप सुटका

दक्षिण मुंबईत इमारतीचा भाग कोसळला; १७ जणांची सुखरूप सुटका

इमारतीचा भाग कोसळला

दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट जवळील युसूफ बिल्डिंगचा काल, मंगळवारी रात्री ९. १५ सुमारास एक भाग कोसळला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबललेल्या १७ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. यात काही जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. महापालिका आपत्कालीन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, क्रॉफर्ड मार्केट, सीआयडी ब्रँचसमोर, स्टार किंग हॉटेलजवळील ‘युसूफ’ या इमारतीचा भाग कोसळला आहे. इमारत तळमजला अधिक ३ मजली अशी आहे. फोर्ट येथे क्रॉफर्ड मार्केटजवळील मंगलदास रोडवर लोहार चाळ येथे युसूफ बिल्डिंग आहे. या इमारतीच्या उत्तरेकडील काही भाग कोसळला. त्यामुळे या परिसरात एकच धावपळ उडाली होती. स्थानिकांनी त्वरीत इमारतीच्या दिशेने भाग घेऊन ढिगारा उपसण्याचे काम केले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनीही घटनास्थळी धाव घेऊन ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा –

चंद्राबाबू नायडू आणि त्यांचा मुलगा नजरकैद

First Published on: September 11, 2019 10:29 AM
Exit mobile version