मुंबईची हवा सुधारतेय, एअर क्वॉलिटी इंडेक्सचा अहवाल

मुंबईची हवा सुधारतेय, एअर क्वॉलिटी इंडेक्सचा अहवाल

बीकेसीची हवा सुधारतेय

मुंबईच्या खालावलेल्या हवेचा दर्जा पूर्वपदावर येत असल्याचा अहवाल सफर या संस्थेने दिला आहे. सफर म्हणजेच सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च’ या संस्थेने नोंदवलेल्या निरीक्षणांतून मुंबई या संपूर्ण शहराची हवा उत्तम आणि समाधानकारक नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, बदललेल्या हवामानानुसार बीकेसी या परिसरातील हवेची गुणवत्ता सातत्याने घसरली होती. पण, आता वांद्रे कुर्ला कॉम्लेक्समधील ही हवा हळूहळू सुधारत असून सफर संस्थेने या परिसरातील हवा मध्यम दर्जाची नोंदवली आहे.

मुंबई शहरापाठोपाठ भांडुप, कुलाबा, माझगाव, वरळी, बोरीवली, चेंबूर , अंधेरी या ठिकाणची हवा उत्तम आणि समाधानकारक नोंदवण्यात आली आहे. तर, मालाड, बीकेसी आणि नवी मुंबई या परिसरातील हवा मध्यम स्वरुपाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईचं तापमानही घसरलं आहे. हवेत पसरलेल्या गारव्यामुळे मुंबईकर सुखावले आहेत. दरम्यान, दुपारच्या वेळेतही हवेत थंडावा जाणवतो आहे. त्यामुळे ऊन आणि सावलीच्या विळख्यात अडकलेले मुंबईकर आता थंडीचा आनंद घेताना आपल्याला दिसतात.

मुंबईतील हवेची गुणवत्ता अचानक ढासळल्याने श्वसनासंबंधी आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली होती. “ गेल्या काही दिवसांमध्ये हवेची गुणवत्ता खालावल्याने आणि बदलत्या हवामानामुळे अप्पर रेस्पीरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे खोकला येणे, शिंका येणे, ताप, छातीत खवखवणे, श्वासोच्छवास अडथळा निर्माण होणे, नाक वाहणे, अंगदुखी अशा तक्रारींनी घेऊन येणाऱ्या रूग्णांमध्ये सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाली होती. तसंच, या रुग्णांपैकी जे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जात होते अशा रुग्णांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. कारण सकाळच्या वेळी हवेत अधिक प्रमाणात धुलिकण असतात जे श्वसनासंबंधी तक्रारी निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. पण, आता मुंबईकर थंडीचा आनंद घेण्यासलाठी सकाळी फिरतात.

First Published on: January 28, 2020 10:33 PM
Exit mobile version