News Paper : 1 जूनपासून मुंबईतील वृत्तपत्रे महागणार; वृत्तपत्र विक्रेता संघटनेचा निर्णय

News Paper : 1 जूनपासून मुंबईतील वृत्तपत्रे महागणार; वृत्तपत्र विक्रेता संघटनेचा निर्णय

1 जूनपासून मुंबईतील वृत्तपत्रे महागणार; वृत्तपत्र विक्रेता संघटनेचा निर्णय

वृत्तपत्र तयार करण्यासाठी लागणाऱ्या कागदांच्या किमती वाढल्याने आता वृत्तपत्र विक्रेता संघटनेने मोठा निर्णय घेतला आहे. ऑनलाईन वृत्तपत्रांमुळे आधीच डबगाईला आलेला वृत्तपत्र व्यवसाय कोरोना महामारीमुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडला. या पार्श्वभूमीवर आता 1 जूनपासून मुंबईतील सर्व भाषिक वृत्तपत्रांच्या किमती वाढवण्याचा निर्यण घेण्यात आला आहे. शिवसेना नेते, राज्याचे उद्योगमंत्री आणि वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

नुकतील सुभाष देसाई यांच्या शिवनेरी या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईतील विक्रेता संघटनेचे प्रतिनिधी, वृत्तपत्र व्यवस्थापनेचे प्रमुख अधिकारी, युनायटेड पह्रम ऑफ न्यूजपेपर मुंबईचे अध्यक्ष बाजीराव दांगट आदी उपस्थित होते. यावेळी वृत्तपत्र व्यवसाय आणि विक्रीदरम्यान भेडसवणाऱ्या अनेक समस्यांवर चर्चा करण्यात आली.वृत्तपत्र व्यवसाय टिकावा तसेच या व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी सुभाष देसाई यांनी मार्गदर्शन केले.

रेल्वे – मेट्रो स्थानकावरील स्टॉल्ससंदर्भात रेल्वे मंत्र्यांची चर्चा

मुंबईतील रेल्वे स्थानकांवर असणाऱ्या व्हीलर स्टॉल्सवर तसेच मेट्रो रेल्वे स्थानकांवर वृत्तपत्रे मिळत नसल्याची तक्रार अनेक प्रवासी वाचकांकडून येत असतात. दरम्यान रेल्वे आणि मेट्रो स्थानकांवरील स्टॉल्स स्थानिक वृत्तपत्र विक्रेत्यांना चालवण्यासाठी द्यावे जेणेकरून यातून अनेकांना रोजगार मिळेले. यासाठी सुभाष देसाई लवकरचं केंद्रीय रेल्वेमंत्री आणि एमएमआरडीसोबत चर्चा करणार असल्याचे म्हणाले आहेत.


 

First Published on: April 29, 2022 11:36 AM
Exit mobile version