मुख्यमंत्र्यांना धमकीचा फोन करणाऱ्याला कोलकात्यात अटक; मुंबई ATS ची कारवाई

मुख्यमंत्र्यांना धमकीचा फोन करणाऱ्याला कोलकात्यात अटक; मुंबई ATS ची कारवाई

उद्धव ठाकरे

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान उडवून देणाऱ्या धमकीचा फोन कॉल दुबईहून आल्याची घटना घडली होती. हा कॉल अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने केल्याचे सांगण्यात आले होते. धमकी देणाऱ्याला मुंबई एटीएसच्या टीमने जेरबंद केले आहे. मुंबई पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ने एकाला कोलकात्यातून अटक केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि शिवसेना नेते संजय राऊत यांना दोन ते सहा महिन्यांच्या कालावधीने धमकीचे फोन केल्याचा आरोप आहे. ४९ वर्षीय आरोपी हा कोलकात्यातील टोलीगंज भागात राहणारा जिम प्रशिक्षक असल्याची माहिती आहे. संजय राऊत यांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर कोलकात्यातील त्याचा ठावठिकाणा शोधण्यात आला.

आरोपीचे वकील अनिर्बन गुहा ठाकुर्ता यांनी दावा केला की, आपल्या अशिलाला अडकवण्यासाठी त्याचा आयपी अ‍ॅड्रेस हॅक करुन व्हीओआयपी (VoIP) कॉल करण्यात आला असावा. मात्र कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून मुंबई पोलिसांना आरोपीची चार दिवसांची कोठडी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ‘मातोश्री’ निवासस्थान उडवून देण्याची धमकी देणारा फोन आल्याचे गेल्या रविवारी (6 सप्टेंबर) समोर आले होते. दुबईहून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक बोलत असल्याचा दावा करणारा फोन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आला होता. त्यामुळे ‘मातोश्री’ निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली.

हेही वाचा –

KEM मध्ये मृत रुग्णाच्या नातेवाईकांची महिला डॉक्टरला अर्वाच्च्य शिवीगाळ; Video व्हायरल!

First Published on: September 12, 2020 4:38 PM
Exit mobile version