Salman Khan: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार; बिश्नोईवर संशय

Salman Khan: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार; बिश्नोईवर संशय

Salman Khan: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर पहाटे गोळीबार

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्रेस्थित घराबाहेर गोळीबार झाला आहे. पहाटे पाच वाजता हा गोळीबार झाल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीसांकडून केला जात आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेतला जात आहे. जेव्हा हा गोळीबार झाला तेव्हा सलमान खान घरीच होता. सलमान खान याला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आलेल्या आहेत. बिश्नोई गँगच्या टार्गेटवर नेहमीच सलमान खान राहिला आहे. त्यामुळे लॉरेन्स बिश्नोई टोळीने गोळीबार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर सलमान खानच्या घराबाहेर पोलीसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. (Mumbai Bandra Salman Khan Early morning shooting outside Bollywood actor Salman Khan s house  doubt on Lawrence Bishnoi)

समोर आलेल्या माहितीनुसार, गोळीबाराच्या 2-3 राऊंड फायर झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच आणि एटीएसची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलक्सी निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. हल्लेखोरांनी हवेत गोळीबार करून तेथून पळ काढला. सध्या या घटनेत कोणीही जखमी झालं नसल्याची माहिती आहे.

बिश्नोईवर संशय 

सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराच्या तपासासाठी पोलीस आणि फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. यापूर्वी सलमानच्या वडीलांना चिठ्ठीद्वारे धमकी देण्यात आली होती. त्यानंतर धमकीचा ई-मेलही आला होता. आता रविवारी 14 एप्रिल रोजी झालेल्या गोळीबाराचा संबंधही बिश्नोई ग‌ँगशी असल्याचं बोललं जात आहे.

बिश्नोईच्या निशाण्यावर का आहे सलमान खान?

1998 साली हम साथ साथ हैं चित्रपटाच्या शूटींगदरम्यान सलमान खान राजस्थानमध्ये होता. त्यावेळी सलमान खानने दोन वेळा चिंकारा हरणांची शिकार केल्याचा आरोप आहे. लॉरेन्स बिश्नोई ज्या बिश्नोई समाजातून येतो, हा समाज निसर्ग पूजक असून त्या समाजात हरणांना देवासमान मानलं जातं. हरणांची शिकार केल्याचा आरोप असल्यामुळे अवघ्या बिश्नोई समाजाचा सलमान खानवर प्रचंड राग आहे. याच रागातून लॉरेन्स बिश्नोई वारंवार सलमान खानला धमक्या देत असल्याचं सांगितलं जातं.

First Published on: April 14, 2024 9:14 AM
Exit mobile version