१८ वर्षे पूर्ण झालेल्या नव मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदवा, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

१८ वर्षे पूर्ण झालेल्या नव मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदवा, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

१८ वर्षे पूर्ण झालेल्या नव मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदवा , जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

काही कारणास्तव आपले नाव मतदार यादीत नोंदविणे प्रलंबित राहिले असेल किंवा १८ वर्षे पूर्ण झालेल्या नव मतदारांचे नाव मतदार यादीत नसेल अशा सर्वांकरिता विशेष संक्षिप्त पुनरिक्षण शिबिरातून नोंदणी करावी, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे. मुंबईतील वरळी येथे नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंड (नॅब) या संस्थेच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या विशेष शिबिराला निवतकर यांनी शनिवारी भेट दिली होती. यावेळी त्यांनी प्रत्येक नागरिकांचे मतदार यादीत नाव असणे, हा त्यांचा हक्कांचा आहे, असे प्रतिपादनही केले.

यावेळी निवतकर म्हणाले की, “संपूर्ण राज्यभर विशेष संक्षिप्त पुनरिक्षक कार्यक्रमाद्वारे १८ वर्षे पूर्ण झालेल्या तसेच दिव्यांग व्यक्ती, देह विक्री करणाऱ्या महिला, तृतीयपंथी यांचे मतदार नोंदणीचे आयोजन करण्यात आले आहे. याकरिता काही संस्थाही स्वत: पुढाकार घेऊन यासाठी पुढे आल्या आहेत.  कोणत्याही १८ वर्ष पूर्ण व्यक्तींचे नाव मतदार यादी असावे यासाठी २७ आणि २८ नोव्हेंबर २०२१ रोजी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यात तरूण, दिव्यांग, तृतीयपंथी, देह विक्री करणाऱ्या महिला आदींनी आपले नाव दाखल करावे.”

“निवडणूक मतदार यादी तयार झाल्यानंतर प्रत्येकाला निवडणूक फोटो कार्ड देण्यात येणार आहे. ज्या मतदारांना निवडणूक फोटो कार्ड मिळणार नाहीत, त्यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी निवडणूक शाखेशी संपर्क साधावा,” असे आवाहन राजीव निवतकर यांनी केले.


First Published on: November 27, 2021 8:22 PM
Exit mobile version