Mumbai Corona : मुंबईकरांनो कोरोना अजून संपलेला नाही, पुढील १५ दिवस महत्त्वाचे

Mumbai Corona : मुंबईकरांनो कोरोना अजून संपलेला नाही, पुढील १५ दिवस महत्त्वाचे

मुंबईत नुकताच गणेशोत्सव सणाची धूम पार पडली आहे. मात्र मुंबईतील कोरोना संकट अद्याप कमी झालेले नाही. त्यामुळे मुंबईकरांसाठी पुढील १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. गेल्य़ा वर्षी गणेशोत्सवर सणादरम्यान मुंबई मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णवाढ पाहायला मिळाली. यावेळी कोरोनाची दुसरी लाट निर्माण झाली. मात्र यंदा ही रुग्णसंख्या वाढून नये आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण होऊन नये यासाठी गणेशोत्सवानंतरच्या १५ दिवसांवर आता आरोग्य प्रशासन लक्ष ठेवून असणार आहे.

सध्या मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त केला जात आहे. यातच गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णसंख्या मोठ्याप्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे येणारे १५ दिवस धोक्याचे असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

गणेशोत्सवासाठी मुंबई बाहेर गेले नागरिक आता पुन्हा मुंबईत परतत आहेत. त्यामुळे मुंबई बाहेरून येणाऱ्या नागरिकांची RTPCR चाचणी करावी असं आवाहन मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता प्रशासनाकडून योग्यत्या उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. मुंबईत २६६ ठिकाणी आरटीपीसीआर चाचणी केंद्र सुरु करण्यात येणार आहे. याठिकाणी बाहेरून येणाऱ्या नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ४१९ कोरोनाबाधित रुग्णांती नोंद झाली आहे. तर ४४७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबई कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्य़ाचे पाहायला मिळत आहे.


First Published on: September 21, 2021 8:52 AM
Exit mobile version