Mumbai Corona Update: मुंबईत १ हजार ९२२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, १,२३६ रुग्णांची कोरोनावर मात

Mumbai Corona Update: मुंबईत १ हजार ९२२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, १,२३६ रुग्णांची कोरोनावर मात

Coronavirus India : 'या' राज्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक, ८४ टक्के नव्या रूग्णांची नोंद

मुंबईत मागील २४ तासात १९२२ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या २४ तासात ४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत एकूण १२३६ कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण ३४,७५,५८१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या ३१,९८७८ वर पोहोचली आहे. १५२६३ रुग्णांवर कोरोनावरील उपचार सुरु आहे. आतापर्यंत फक्त मुंबईत ११,५३९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे होम क्वारंटाईन होणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. मार्च २०२० पासून आतापर्यंत कोरोना संसर्गामुळे ४५ लाख ५० हजारांपेक्षा अधिक नागरिकांना होम क्वारंटाईन करावे लागले आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने होम क्वारंटाईन तसेच संस्थात्मक क्वारंटाईन होणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे.

राज्यात कोरोना संसर्ग वेगाने पसरत आहे. कोरोनामुळे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. आज ९,५१० करोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. तर राज्यात आजपर्यंत एकूण २१,५४,२५३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.७७ % एवढे झाले आहे. मागील २४ तासात राज्यात १७,८६४ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यात आज ८७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

First Published on: March 16, 2021 9:39 PM
Exit mobile version