Mumbai Corona Update: मुंबईकरांसाठी दिलासा! कोरोना रिकव्हरी रेट ९१ टक्क्यांवर

Mumbai Corona Update: मुंबईकरांसाठी दिलासा! कोरोना रिकव्हरी रेट ९१ टक्क्यांवर

Mumbai Corona Update : मुंबईकरांना मोठा दिलासा, २४ तासात शून्य रुग्ण मृत्यूसह ४४ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईत कोरोनाबाधितांची रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांच्या नव्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत २ हजार ६७८ नवे कोरोनाबाधित आढळले असून ६२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३ हजार ६०८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ६ लाख ७४ हजार ७२वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १३ हजार ७४९ जणांचा मृत्यू झाला असून ६ लाख १० हजार ४३ जण कोरोनामुक्त झाले आहे. मुंबईतील रिकव्हर रेट वाढला असून तो ९१ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या ४८ हजार ४८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबईत आज दिवसभरात ३३ हजार ३७८ कोरोनाच्या चाचण्या झाल्या असून आतापर्यंत ५६ लाख ७७ हजार ७८० जणांचा लसीकरण पार पडले आहे. दरम्यान आज मृत्यू झालेल्या ६२ रुग्णांपैकी ३२ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. तसेच यामध्ये ३७ रुग्ण पुरुष आणि २५ रुग्ण महिला होत्या. ३ रुग्णांचे वय ४० वर्षा खाली होते. तर ३८ रुग्णांचे वय ६० वर्षावर होते. उर्वरित २१ रुग्ण ४० ते ६० वयोगटामधील होते.

सध्या मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर ९१ टक्के इतका आहे. १ मे ते ९ मे २०२१ पर्यंत मुंबईतील एकूण कोरोना वाढीचा दर ०.४६ टक्के इतका असून दुप्पटीचा दर १४५ दिवसांवर आहे. मुंबईतील सक्रिय कंटेनमेंट झाने ९३ आहेत, तर सक्रिय सीलबंदी इमारती ५८१ आहेत.


हेही वाचा – Coronavirus: देशातील १८० जिल्ह्यांत ७ दिवसांत एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही – केंद्रीय आरोग्यमंत्री


 

First Published on: May 8, 2021 8:17 PM
Exit mobile version