Mumbai Corona Update: मुंबईत कोरोना परिस्थिती सुधारतेय! २४ तासांत ३,९२५ रुग्णांची नोंद

Mumbai Corona Update: मुंबईत कोरोना परिस्थिती सुधारतेय! २४ तासांत ३,९२५ रुग्णांची नोंद

Mumbai Corona Update : मुंबईकरांना मोठा दिलासा, २४ तासात शून्य रुग्ण मृत्यूसह ४४ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईत कोरोनाची परिस्थिती सुधारताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होतोना दिसत आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत ३ हजार ९२५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ८९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ६ हजार ३८० जण रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईतील आता कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख ४८ हजार ६२४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १३ हजार १६१ रुग्णांचा मृत्यू झाला असून ५ लाख ७२ हजार ४३१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

सध्या मुंबईत ६१ हजार ४३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात ४३ हजार ५२५ कोरोनाच्या चाचण्या झाल्या असून आतापर्यंत ५४ लाख २३ हजार ९९८ जणांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. दरम्यान आज ८९ मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ४२ रुग्णांनी काही दीर्घकालीन आजार होते. ५६ रुग्ण पुरुष आणि ३३ रुग्ण महिला होत्या. ३ रुग्णांचे वय ४० वर्षा खाली होते. ५४ रुग्णांचे वय ६० वर्षावर होते. उर्वरित ३२ रुग्ण ४० ते ६० वयोगटामधील होते.

मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचे दर ८८ टक्के झाले आहे. २३ एप्रिल ते २९ एप्रिल २०२१ पर्यंत मुंबईतील एकूण कोरोनाचा वाढीचा दर ०.७८ टक्के असून दुप्पटीचा दर ८७ दिवस झाला आहे. सध्या सक्रिय कंटेनमेंट झोन ११२ असून सक्रिय सीलबंद इमारती १ हजार १७ इतक्या झाल्या आहेत.


हेही वाचा – कोरोनाचे नियम पायदळी; लग्न सोहळ्यावर कारवाई, एफआयआर दाखल


 

First Published on: April 30, 2021 8:50 PM
Exit mobile version