मुंबई पालिका क्षेत्रात शुक्रवारी मागील २४ तासात ४४६ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ४७० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मुंबईतील सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये मोठी घट झाली असून सध्या ६ हजार ९७३ कोरोनाबाधितांवर मुंबई पालिका क्षेत्रात उपचार सुरु आहेत. मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये आणि सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होत असल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. परंतु राज्यातील ८ ते ९ जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे निर्बंधांमध्ये शिथिलता देता येणार नसल्याचे राज्य सरकारने म्हटलं आहे. यामुळे मुंबईकरांना शिथिलतेसाठी अजून काही काळ प्रतिक्षा करावीच लागणार आहे.
मुंबईतील सध्या ६ हजार ९७३ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु असून आतापर्यंत एकूण ७ लाख ३० हजार २४१ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ७ लाख ५ हजार २३४ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे १५ हजार ६७८ कोरोना रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुंबईत मागील २४ तासात ४७० कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली असून ३५ हजार ३६२ कोरोना चाचण्या गेल्या २४ तासात करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ७७ लाख ३९९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
#CoronavirusUpdates
१६ जुलै, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण – ४४६
२४ तासात बरे झालेले रुग्ण – ४७०
बरे झालेले एकूण रुग्ण – ७०५२३४
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९६%एकूण सक्रिय रुग्ण- ६९७३
दुप्पटीचा दर- ९५१ दिवस
कोविड वाढीचा दर ( ९ जुलै ते १५ जुलै)- ०.०७ % #NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 16, 2021
मुंबईत मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ८ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. ७ रुग्ण पुरुष व ४ रुग्ण महिला होते. ८ रुग्णांचे वय ६० वर्षा वर होते. उर्वरित ३ रुग्ण ४० ते ६० वयोगटामधील होते. मुबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर ९६ टक्क्यांवर गेला आहे. तर ९ जुलै ते १५ जुलै या एक आठवड्याच्या कालावधीत कोविड वाढीचा दर ०.०७ टक्क्यांवर आला आहे. तर मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर ९५१ दिवसांवर गेला आहे.
#CoronavirusUpdates
१६ जुलै, संध्या. ६:०० वाजता#कोरोना_ला_ना #NaToCorona pic.twitter.com/EuEhW5ugHh— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 16, 2021