Mumbai Corona Update: मुंबईत २४ तासांत ५६६ रुग्णांची कोरोनावर मात, ६०० नव्या कोरोनाबाधितांची नोंद

Mumbai Corona Update: मुंबईत २४ तासांत ५६६ रुग्णांची कोरोनावर मात, ६०० नव्या कोरोनाबाधितांची नोंद

Mumbai Corona Update: मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांवर, गेल्या २४ तासात ३५१ कोरोनबाधितांची नोंद

मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी जास्त होत आहे. मुंबई पालिका क्षेत्रात कधी कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय तर कधी कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढतो आहे. मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा आटोक्या आला असला तरी राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या मात्र अजूनही मोठ्या प्रमाणात आहे. मुंबईत मागील २४ तासात एकूण ६०० कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मागील २४ तासात १३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर गुरुवारीही १३ बाधितांचाच मृत्यू झाला होता. दोन दिवसांची मृत्यू संख्या सारखी असली तरी कोरोनबाधितांच्या आढळण्याचे प्रमाण हे ५० रुग्णांनी पुढे आहे.

मुंबईत सध्या ७ हजार ७३१ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत मुंबईत ७ लाख २६ हजार ६३७ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे यापैकी ७ लाख ९७४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मुंबई पालिका क्षेत्रात एकूण १५ हजार ५९९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी चाचण्यांचा वेग वाढवण्यात आला आहे. गेल्या २४ तासात ३९ हजार ७५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत तर एकूण चाचण्यांची संख्या ७४ लाख ६२ हजार ५५८ वर पोहोचली आहे.

मुंबईत मागील २४ तासात मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी १० रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. यामध्ये ९ रुग्ण पुरुष व ४ रुग्ण महिला होते. १० रुग्णांचे वय ६० वर्षावर होते. उर्वरित ३ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते. मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्क्यांवर स्थिरावला आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर ८९२ दिवसांवर गेला असल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. सध्या मुंबईत १० ठिकाण कोरोना प्रतिबंधक म्हणून घोषित करण्यात आल्या असून ६३ इमारती सील करण्यात आल्या आहेत.

First Published on: July 9, 2021 10:29 PM
Exit mobile version