Mumbai Corona Update: मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; १९१९ रुग्ण बरे

Mumbai Corona Update: मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; १९१९ रुग्ण बरे

Mumbai Corona Update : मुंबईकरांना मोठा दिलासा, २४ तासात शून्य रुग्ण मृत्यूसह ४४ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात मुंबई महापालिका आणि प्रशासनाला काहीसे यश मिळताना दिसत आहे. कोरोनाबाधितांची संख्या हळूहळू कमी होत आहे. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट झाली. शुक्रवारी मुंबईत ६९३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. मात्र, शनिवारी मुंबईत ६४८ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या ७ लाख १९ हजार ६१० इतकी झाली आहे. तसेच मृतांच्या संख्येतही घट झाल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवारी २० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता, तर शनिवारी हा आकडा १५ इतका झाला. मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या मृत्यूंची संख्या ही १५ हजार ३८३ इतकी झाली आहे.

१९१९ रुग्ण बरे होऊन घरी परतले

तसेच आणखी एक समाधानकारक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत बाधित झालेल्या रुग्णांपेक्षा कोरोनातून मुक्त झालेल्यांची संख्या जास्त होती. शनिवारी ६४८ कोरोनाबाधितांची नोंद झाली असताना १९१९ रुग्ण बरे होऊन घरी परतले. मुंबईत आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६ लाख ९२ हजार ७८७ इतकी झाली आहे. त्यामुळे मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९६ टक्के इतके झाले आहे.

रुग्णवाढीचा दर ०.०९ टक्के

मुंबईत मागील २४ तासांत ३३ हजार ७५९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातील ६४८ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मुंबईत सध्या ९ हजार १४८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच मुंबईत १९ जून ते २५ जून या कालावधीत कोरोना रुग्णवाढीचा दर हा ०.०९ टक्के इतका होता. तर रुग्ण दुप्पटीचा दर ७२३ दिवस इतका झाला आहे.

First Published on: June 26, 2021 8:09 PM
Exit mobile version