Mumbai Corona Update: मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार सुरुच, गेल्या २४ तासात ७६२ कोरोनाबाधितांची नोंद

Mumbai Corona Update: मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार सुरुच, गेल्या २४ तासात ७६२ कोरोनाबाधितांची नोंद

Mumbai Corona virus Update 3,671 new covid-19 positive patients registered in mumbai today

मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आली आहे. परंतु कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस चढ-उतार सरुच आहे. कोरोनाबाधितांची संख्या ६०० ते ८०० प्रमाणात आहे. मुंबईत गेल्या २४ तासात ७६२ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ६८४ कोरोनारुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत गेल्या २४ तासात १९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत मागील काही दिवसांपासून कोरोनारुग्णांच्या मृत्यूची संख्या खालावलेली आहे. आतापर्यंत मुंबईत एकूण ७ लाख १९ हजार ९४१ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी जास्त होत असल्यामुळे मुंबईवरील कोरोना संकट कायम असल्याचे दिसत आहे.

मुंबईत आतापर्यंत ६ लाख ८७ हजार ५५० कोरोनाबाधितांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. यामध्ये मागील २४ तासात ६८४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सध्या मुंबईत १४ हजार ८६० कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर मुंबई पालिका क्षेत्रात एकूण ६७ लाख ५३ हजार ६६६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी १४ रुग्णांना काही दीर्घकालीन आजारी होते. ११ रुग्ण पुरुष व ८ रुग्ण महिला होते. ८ रुग्णांचे वय ६० वर्षावर होते तर उर्वरित ११ रुग्ण ४० ते ६० वयोगटामधीत होते.

मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर हा ७३४ दिवसांचा झाला आहे. यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. सध्या १८ इमारती कोरोना प्रतिबंधक झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर ८५ इमारतींना सील करण्यात आले आहे. मुंबईतील कोरोना पॉझिटिव्हिटि रेट जास्त असल्यामुळे अद्याप मुंबई लोकलबाबत प्रशासनानं काही निर्णय घेतला नाही.

First Published on: June 18, 2021 9:46 PM
Exit mobile version