Mumbai corona update: मुंबईचा कोरोना रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर, तर दिवसभरात ५४२ रुग्ण कोरोनामुक्त

Mumbai corona update: मुंबईचा कोरोना रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर, तर दिवसभरात ५४२ रुग्ण कोरोनामुक्त

Mumbai Corona Update : मुंबईकरांना मोठा दिलासा, २४ तासात शून्य रुग्ण मृत्यूसह ४४ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईकरांसाठी काहीशी दिलासजनक बातमी आहे, कारण नवीन कोरोनाबाधित रुग्णांबरोबरच मुंबईत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. कालच्या तुलनेत मुंबईतील कोरोना आकडेवारीत काहीसा चढ-उतार पाहायला मिळत आहे. कारण आज रुग्णसंख्येत थोडी वाढ झाल्याचे पाहायला मिळाली. परंतु मृतांचा आकडा स्थिर आहे. मुंबईत गेल्या गेल्या २४ तासांत ७८९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर कालप्रमाणे आजही १० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. मात्र मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर गेला आहे.

पालिकेच्या आकडेवारीनुसार, मुंबईत गेल्या २४ तासांत ७८९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईत आत्तापर्यंतची एकुण रुग्णसंख्या ७ लाख २४ हजार ११३ वर पोहचली आहे. तर आज ५२४ रुग्ण कोरोनातून मुक्त होत घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ६ लाख ९१ हजार ६७० वर पोहचली आहे. यात आज १० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील कोरोना मृतांचा १५ हजार ३४८ झाला आहे.

मुंबईतील रुग्णसंख्येचा दुप्पटीचा दर ७२६ दिवसांवर पोहचला आहे. तर १७ जून ते २३ जूनपर्यंत मुंबईतील एकूण कोरोना रुग्णसंख्या वाढीचा दर ०.०९ टक्के झाला आहे. सध्या मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या आता १४ हजार ८१० वर पोहचली आहे.मुंबईत मागील २४ तासात ३५ हजार ७६४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर आतापर्यंत ६९ लाख ४७ हजार २९० चाचण्या करण्यात आल्या आहेत.

मुंबईत ११ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत तर सक्रीय ८७ सीलबंद इमारती आहेत. मागील २४ तासात मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ५ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. ३ रुग्ण पुरुष व ७रुग्ण महिला होते. ६ रूग्णांचे वय ४० ते ६० वयोगटातील होते. १ रुग्णाचे वय ४० वर्षाखाली होते, तर उर्वरित ३ रुग्णांचे वय ४० ते ६० वयोगटातील होते.


 

First Published on: June 24, 2021 9:21 PM
Exit mobile version