Mumbai Corona Update: मुंबईत कोरोनाचा विस्फोट, ५ हजार ६७ कोरोना रुग्णांची नोंद

Mumbai Corona Update: मुंबईत कोरोनाचा विस्फोट, ५ हजार ६७ कोरोना रुग्णांची नोंद

corona

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. राज्यात सर्वात जास्त कोरोना रुग्णांची नोंद मुंबई जिल्ह्यात होत आहे. त्यामुळे मुंबई पालिकेच्या चिंतेत वाढ झाली आहे. मुंबई आणि उपनगरांत मागील आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मागील २४ तासात ५ हजार ६७ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून हा आजवरचा सर्वात जास्त आकडा आहे. तर मागील २४ तासात ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांच्या सातत्याने होणाऱ्या वाढीमध्ये मृतांची संख्ये घटली असल्याची दिलासादायक बाब आहे.

मुबंईत गेल्या २४ तासात २०८८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच आतापर्यंत एकूण ३,७४,६११ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे यातून ३३१३२२ कोरोना रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तसेच एकूण ११६०६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मुंबईत मागील काही दिवसांपासून कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवले असल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. परंतु राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना आता मुंबईत एकाच दिवशी ५ हजारच्या पार रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता मुंबईत लॉकडाऊन होणार की काय असे चित्र निर्माण झाला आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी मुंबईत लॉकडाऊन करणार नाही असे वक्तव्य पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी म्हटले आहे. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिल्यास विनाकारण लॉकडाऊन करण्यात येईल.

First Published on: March 24, 2021 8:38 PM
Exit mobile version